Tuesday, July 22, 2025
Homeमहाराष्ट्रइचलकरंजी : महिलेवर ऐडक्याने वार; पाच जणांवर गुन्हा

इचलकरंजी : महिलेवर ऐडक्याने वार; पाच जणांवर गुन्हा

इचलकरंजी : महिलेवर ऐडक्याने वार; पाच जणांवर गुन्हा

 

फटाके उडविण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून महिलेला दगडाने मारहाण व एडक्याने वार करुन जखमी केल्याप्रकरणी गावभाग पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलमान राजू नदाफ (रा. परीट गल्ली गावभाग), अविनाश पडीया, आरसलान सय्यद, यश आणि आंबादास अशी त्यांची नांवे आहेत.या प्रकरणी पुनम प्रशांत कुलकर्णी (वय ४३ रा. जैनबस्ती) यांनी फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पुनम कुलकर्णी या गावभागातील जगताप तालीम परिसरात भाड्याने ब्यूटी पार्लर चालवितात. मंगळवारी (१५ जुलै) रात्रीच्या सुमारास सलमान, अविनाश, आरसलान, यश व आंबादास हे फटाके उडवत होते. त्यावेळी फटाक्याचा एक तुकडा हा फिर्यादींच्या जवळ येऊन पडला. त्यावेळी कुलकर्णी यांनी सलमान यास येथे फटाके लावू नका, तिकडे लांब जावून लावा असे सांगितले. त्यावरुन सलमानसह त्याच्या साथीदारांनी कुलकर्णी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

 

तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने हिला संपवून टाकूया म्हणत दगड फेकून मारला. तर पडीयार याने लोखंडी एडक्याने कुलकर्णी यांच्या दंडावर मारले तर अन्य साथीदारांनी ब्युटी पार्लरच्या खोलीचा दरवाजा, बोर्ड, खिडकीची आणि शेजारील लाड यांच्या दुकानाचे शटर व पाटील यांच्या शौचालयाच्या दरवाज्याची तोडफोड करत नुकसान केले. या प्रकरणी पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यातील सलमान नदाफ याच्यावर गावभाग पोलिस ठाण्यात ८ व शिवाजीनगर पोलिस ठाण्यात २ असे १० गुन्हे दाखल आहेत. तर अविनाश पडीयार याच्यावर गावभाग पोलिसात २ व शिवाजीनगर पोलिसात १ असे तीन गुन्हे दाखल आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -