Wednesday, July 23, 2025
Homeमहाराष्ट्रवीज स्वस्त होणार : मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

वीज स्वस्त होणार : मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

महाराष्ट्रात औद्योगिक वीज दर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वांत कमी होणार आहेत. नवीन टॅरिफनुसार सध्या महाराष्ट्राचा दर ८.३२ आहे. जो पुढील टप्प्यात ७.३८ रुपयांवर येणार आहे. या तुलनेत, तामिळनाडूचा दर ९.०४, गुजरात ८.९८ आणि कर्नाटक ७.७५ रुपये इतका आहे. पुढील काही वर्षांत महाराष्ट्रात औद्योगिक वीज दर कमी राहील. तसेच टॅरिफ टू-अप प्रक्रियेमुळे दर वाढणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.

 

सदस्य अभिजीत वंजारी यांनी राज्यातील वीज दरवाढ कमी करण्यासंदर्भात करत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती विचारली. यावेळी सदस्य शशिकांत शिंदे, सतेज उर्फ बंटी पाटील आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपप्रश्न विचारले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विद्युत खरेदी आता ‘मेरीट ऑर्डर डिस्पॅच’ राहतील, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आधीच्या टॅरिफ पिटिशनमध्ये रहिवासी ग्राहकांवर भार टाकून इंडस्ट्रियल आणि कमर्शियल दर कमी केले गेले. परंतू यावरील आक्षेपांमुळे आता सगळ्याच कॅटेगरीमध्ये दर कमी झाले आहेत. ७० टक्के ग्राहक शेतकऱ्यांसाठी सोलर पंप योजनांमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून बूस्टर पंपासाठी नवीन योजना आणली आहे. सिंगल पोल योजनेचा खर्च फक्त १५,००० रुपये आहे. शेतकऱ्यांना गरजेनुसार १० एचपी हॉर्स पॉवरचे सोलर पंप देण्याची तयारी आहे. याबाबतची काही तक्रार असल्यास सोलर युनिफाईड पोर्टलवर समाधान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पध्दतीने केली जाणार आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांकडून स्वस्त दरात वीज खरेदी केली जाते. तसेच सोलर, विंड आणि बॅटरी स्टोरेजच्या वापरामुळे विजेच्या खरेदीची किंमत मोठ्या प्रमाणात घटली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -