रत्नागिरी-नागपूर महामार्गावर टाकळी (ता. मिरज) गावाजवळ मोटार दुभाजकाला धडकून चालक मोहम्मदसुहान इस्माईल शेख (वय 19, रा. सुभाषनगर, मिरज) या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला.
मंगळवार, दि. 15 रोजी सकाळी 6 वाजता टाकळी येथील पुलावर घडला.
मोहम्मद सुहान शेख हा मंगळवारी पहाटे मोटार (एपी 31 बी झेड 6833) घेऊन वेगात महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. टाकळी पुलाजवळ मोटार रस्ता दुभाजकाला धडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. निष्काळजीपणे मोटार चालवून दुभाजकाला धडक देऊन अपघातात स्वतःच्या मृत्यूस, वाहनाच्या व महामार्गाच्या साहित्याच्या नुकसानीस कारणीभूत झाल्याबद्दल महंमदसुहान शेख याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महंमदसुहान महाविद्यालयीन शिक्षण घेत असून तो ‘सीए’ परीक्षेची तयारी करीत होता. मंगळवारी मध्यरात्री घरात झालेल्या किरकोळ वादातून तो रागात बाहेर पडला होता. वडिलांची मोटार घेऊन भरधाव वेगाने जात असताना अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला.