राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर थोडा कमी आहे. मात्र, पाणलोट क्षेत्रातून धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. त्यामुळे धरणात ७.४५ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ८९. ११ टक्के भरले आहे. पावसाचा जोर वाढल्यास लवकरच धरण ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.
धरण क्षेत्रात गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात ९ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जून पासून आजपर्यंत २८.२५ मी.मी. पाऊस नोंदवला गेला आहे. धरणातून भोगावती नदीत ३१०० क्युसेकने विसर्ग सुरु आहे.