Saturday, January 17, 2026
Homeइचलकरंजीरांगोळी ग्रामपंचायत सदस्याचा निर्घृण खून

रांगोळी ग्रामपंचायत सदस्याचा निर्घृण खून

रांगोळी (ता. हातकणंगले) ग्रामपंचायत सदस्य लखन अण्णासो बेनाडे (वय 35) यांचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मारेकर्‍यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे दोन तुकडे करून तो अर्धवट जाळलेल्या अवस्थेत संकेश्वरनजीक हिरण्यकेशी नदीत फेकून दिला होता.

 

आठ दिवसांपासून बेनाडे बेपत्ता होते आणि ही घटना पाच ते सहा दिवसांपूर्वी घडल्याचा अंदाज तपासात व्यक्त होत आहे.

 

याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या चौकशीतून हा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे रांगोळी आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बेनाडे बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांची बहीण नीता उमाजी तडाखे (रा. आवळे गल्ली, इचलकरंजी) यांनी गुरुवारी (दि. 10) गावभाग पोलिसांत दिली होती.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लखन बेनाडे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते. त्यांच्यातील वादाचे व्हिडीओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे या हत्याकांडात संबंधित महिलेचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -