Tuesday, July 22, 2025
Homeइचलकरंजीमहिलेला मारहाणप्रकरणी दोघांना पोलिस कोठडी

महिलेला मारहाणप्रकरणी दोघांना पोलिस कोठडी

फटाके अन्यत्र जावून उडवण्यास सांगितल्याच्या कारणावरुन व्युटीपार्लर चालक महिलेस दगडाने मारहाण करून लोखंडी ऐडक्याने वार केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी वजिर ग्रुपच्या दोघांना अटक केली आहे. यश संदीप भिसे आणि रोहित असाल अशी त्यांची नावे असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गावभागातील पुनम कुलकर्णी यांचे जगताप तालीम परिसरात ब्युटीपार्लर आहे. ब्युटीपार्लर समोर फटाके वाजवणाऱ्या सलमान नदाफ, अविनाश पडीयार, आरसलान सय्यद यांच्यासह पाचजणांना कुलकर्णी यांनी अन्यत्र फटाके वाजवण्यास सांगितले. या रागातून संशयितांनी कुलकर्णी यांना शिवीगाळ करत दगड फेकुन आणि लोखंडी ऐडक्याने वार करून गंभीर जखमी केले होते. तसेच ब्युटीपार्लरसह शेजारील दुकान, शौचालायाचे नुकसान केले होते. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरुन गावभाग पोलीस ठाण्यात ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी यापैकी संशयीत यश भिसे आणि रोहित असाल या दोघांना अटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -