Tuesday, July 22, 2025
Homeनोकरीसरकारी नोकरीची सुवर्णसंधी! GSSC कडून 436 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, कसा कराल अर्ज? 

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! GSSC कडून 436 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, कसा कराल अर्ज? 

गोव्यात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गोवा कर्मचारी निवड आयोगाकडून (GSSC) विविध सरकारी विभागांमध्ये तब्बल ४३६ पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

 

या भरती प्रक्रियेमध्ये लेखा विभाग, कर विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), वीज विभाग, कृषी विभाग आणि इतर विविध खात्यांतील रिक्त पदांचा समावेश आहे. त्यामुळे विविध शैक्षणिक पात्रतेनुसार पात्र उमेदवारांना या भरतीतून सरकारी सेवेत दाखल होण्याची मोठी संधी मिळणार आहे.

 

भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ८ ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://gssc.goa.gov.in ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागणार आहे.

 

भरतीबाबत महत्वाची माहिती

 

एकूण पदांची संख्या : ४३६

 

खात्यांमध्ये भरती : लेखा, कर, पीडब्ल्यूडी, वीज, कृषी व अन्य

 

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : ८ ऑगस्ट २०२५

 

अर्जाची प्रक्रिया : ऑनलाईन – https://gssc.goa.gov.in

 

सरकारी नोकरीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांनी ही संधी नक्कीच दवडू नये. आयोगाकडून लवकरच पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता व इतर तपशील वेबसाइटवर जाहीर करण्यात आलीय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -