Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्रप्रसिद्ध अभिनेत्याचे किडनी फेलमुळे निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

प्रसिद्ध अभिनेत्याचे किडनी फेलमुळे निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि विनोदी कलाकार फिश वेंकट यांचे 18 जुलै 2025 रोजी निधन झाले.(failure)त्यांच्या निधनाने संपूर्ण दक्षिण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. फिश वेंकट हे मूळचे मंगळमपल्ली वेंकटेश असून, 53 वर्षांचे होते. त्यांचे निधन किडनी निकामी होण्यामुळे झाले. ते गेल्या अनेक महिन्यांपासून किडनी आणि लिव्हर फेल्युअरशी झुंज देत होते. त्यांच्यावर हैदराबादमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. व्हेंटिलेटरवर असतानाच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

 

काही महिन्यांपासून ते गंभीर आजारी होते. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या आणि त्यांना डायलिसिसवर ठेवण्यात आले होते. (failure)उपचारांसाठी त्यांना सुमारे ५० लाख रुपयांची गरज होती. त्यांच्या कुटुंबाने आर्थिक मदतीचे आवाहनही केले होते, परंतु अपेक्षित मदत मिळाली नाही. अभिनेता पवन कल्याण यांनी २ लाखांची मदत केली होती, तसेच विश्वक सेन आणि एका तेलंगणा मंत्र्यांनी मदतीचा हात पुढे केला होता. मात्र वेळेत योग्य किडनी डोनर न मिळाल्याने त्यांच्यावर प्रत्यारोपण करता आले नाही.

 

फिश वेंकट हे तेलंगणाच्या बोलीभाषेतील त्यांच्या खास स्टाईलमुळे लोकप्रिय होते. (failure)त्यांनी आपल्या करिअरमध्ये 100 पेक्षा अधिक चित्रपटांत विनोदी व सहाय्यक भूमिका साकारल्या. ‘अर्जुन’, ‘गब्बर सिंग’, ‘अधुर्स’, ‘बन्नी’, ‘डी’, ‘डीजे टिल्लू’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. त्यांनी एके काळी हैदराबादमध्ये मासळी विक्रेत्याचे काम केले होते म्हणून त्यांना ‘फिश वेंकट’ असे नाव पडले.फिश वेंकट यांच्या पत्नी सुवर्णा आणि मुलगी श्रावंती असा परिवार आहे. अनेक चाहत्यांनी आणि चित्रपटसृष्टीतील सहकलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यावर हैदराबादमध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -