Monday, July 21, 2025
Homeमहाराष्ट्रपुढील वर्षी दहावी आणि बारावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी !

पुढील वर्षी दहावी आणि बारावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी !

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होऊन आता बऱ्याच दिवस उलटले आहेत आणि विद्यार्थी आता पुढील वर्गात गेले आहेत.

 

बारावीनंतर बऱ्याचश्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे.

 

तर काही विद्यार्थ्यांनी BA, बीकॉम, बीएससी सारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य दाखवले आहे. दुसरीकडे दहावीनंतरही बरेचसे विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सेस साठी ऍडमिशन घेतात. तसेच अनेकांनी अकरावीला ऍडमिशन घेतले आहे.

 

दरम्यान आज आपण दहावी अन बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने सुरु केलेल्या एका महत्वाच्या योजनेची माहिती घेणार आहोत. खरेतर, दहावी अन बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एका शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 10 हजाराची मदत दिली जात आहे.

 

कोणाला मिळतो लाभ?

 

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’मार्फत शिष्यवृत्ती योजना राबवली जात आहे. या अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवली जाते.

 

या योजनेनुसार, पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना महामंडळाकडून थेट 10 हजार रुपयांची रक्कम जमा केली जात आहे. पण एका नोंदणीकृत कामगाराच्या अधिकतम दोन मुलांनाच याचा लाभ मिळतो. ते पण 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत 50 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळाल्यास शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

 

तसेच विद्यार्थ्याचे आई किंवा वडील कोणीही एकजण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे.

 

अर्ज कसा करणार ?

 

सगळ्यात आधी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्हाला या योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज डाऊन लोड करायचा आहे. हा अर्ज डाउनलोड झाल्यावर तुम्हाला त्याची प्रिंट आऊट काढायची आहे आणि मग तो अर्ज काळजीपूर्वक भरून तुम्हाला तो अर्ज जमा करायचा आहे.

 

हा विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला अर्ज आणि त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तो तुमच्या जिल्ह्यातील संबंधित कार्यालयात म्हणजे कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार कार्यालयात जमा करायचा आहे.

 

पण तुम्ही अर्ज जमा केल्यानंतर कार्यालयातून त्याची पावती घ्यायला विसरू नका. या पावतीवर अर्ज जमा केल्याची तारीख आणि एक युनिक क्रमांक असतो जो की भविष्यात तुमच्यासाठी कामाचा राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -