शासनाने बंदी घातली असतानाही माया विक्री करणाऱ्या चार पान पन्यावर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई करत ४३४० रुपयांचा मुद्देमाल जम केला. या कारवाईत दस्तगीर बाळू जमादार (४२. आभारफाटा), निलेश काशिनाथ पाटील (वय २५ रा. पोलसे मळा चंदूर), अरबाज राजू मुजावर (वय २३ रा. नेहरुनगर) व जमीर ख्वाजा हुसेन शेख (वय २२ रा. सहारानगर रुई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पो.कॉ. सुकुमार बरगाले यानी फिर्याद दिली आहे.
आभारफाटा चौक चंदूर येथील डी. जे. पानशॉप, बाळूमामा पानश सई येथील एस. एम. पानांप व तांबेमाळ परिसरातील टेम्पो अड्डा याठिकाणी मावा विक्री सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी त्याठिकाणी कारवाई करत वेगवेगळी पत्ती, सुंगधी सुपारीय तंबाखू यापासून बनविलेल्या १९० रुपयांच्या माव्याच्या १९ पुड्या ५०० ग्रॅम वजनाची ४५० रुपयांचा तंबाखू, ५०० ग्रॅम वजनाचा ८०० रुपयांचा तयार मावा व २९०० रुपयांची रोकड असा ४३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास सपोनि वायदंडे करत आहेत,