Tuesday, July 22, 2025
Homeइचलकरंजीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज इचलकरंजीत महारक्तदान शिबीराचे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज इचलकरंजीत महारक्तदान शिबीराचे आयोजन

राज्याचे धडाडीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार 22 जुलै रोजी भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर यांच्या वतीने महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार भाजपा इचलकरंजी शहर कार्यालय, आमदार डॉ. राहुल आवाडे जनसंपर्क कार्यालय आणि कोरोची याठिकाणी हे रक्तदान शिबीर होणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त दात्यांनी सहभागी होऊन उच्चांकी असे रक्तदान करावे, असे आवाहन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सुचनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस कोणताही गाजावाजा न करता सध्याची गरज ओळखून व सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक उपक्रमांद्वारे साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आहे. त्या अनुषंगाने इचलकरंजीत भारतीय जनता पार्टी पूर्व, पश्‍चिम आणि ग्रामीण या तिन्ही मंडलच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा इचलकरंजी पूर्व मंडलच्या वतीने डॉ. राहुल आवाडे जनसंपर्क कार्यालय याठिकाणी, इचलकरंजी पश्‍चिम मंडलच्या वतीने भाजपा शहर कार्यालय आणि भाजपा ग्रामीण मंडलच्या वतीने कोरोची येथील हनुमान मंदिर हॉल याठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजल्यापासून शिबीराला सुरुवात होणार आहे. या शिबीरासाठी आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात विकासाची गंगा अविरतपणे वाहत आहे. ती अशीच प्रवाहीत राहण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिनी होणार्‍या महारक्तदान शिबीरात जास्तीत जास्त दात्यांनी सहभागी होऊन उच्चांकी असे रक्तदान करावे, असे आवाहन माजी मंत्री आवाडे यांनी केले.

यावेळी प्रकाश दत्तवाडे, भाजपा इचलकरंजी पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्‍चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते, ग्रामीण मंडल अध्यक्ष बाळासाहेब माने, मनोज हिंगमिरे, अरविंद शर्मा, धोंडीराम जावळे, बाळासाहेब कलागते, वृषभ जैन, संजय केंगार, राजेश रजपुते, सतिश पंडीत, युवराज माळी, पुनम जाधव, आदींसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -