एकेमेकांना ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी तुम्हीही फोन पे किंवा गुगल पे नक्कीच वापरत असाल. तर खरं या सुविधेमुळे आपला बँकेत जाण्याचा वेळ वाचतो आणि अगदी कमी वेळेत एकमेकांना पैसे पाठवणे तसेच इतर अनेक कामे आपण करू शकतो. परंतु आता फोन पे आणि गुगल पे वापरकर्त्यांना झटका देणारी बातमी समोर आली आहे. येत्या १ ऑगस्ट पासून फोनपे आणि गुगल पे बाबत नियम बदलले आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI सिस्टम जलद, सुरक्षित आणि स्थिर करण्यासाठी बँका आणि पेमेंट अॅप्ससाठी नवीन API मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्याचा परिणाम थेट सर्वसामान्य ग्राहकांवर होणार आहे.
काय आहेत नवीन नियम?
नवीन नियमानुसार, (PhonePe Gpay New Rules) येत्या १ ऑगस्ट पासून तुम्ही फोन पे किंवा गुगल पे च्या माध्यमातून दिवसातून फक्त ५० वेळा बँक खात्यातील बॅलेन्स तपासू शकाल. NPCI चा असा विश्वास आहे की यामुळे सर्व्हरवरील अनावश्यक भार कमी होईल आणि वेग सुधारेल. तसेच तुम्हाला मोबाईल नंबरशी लिंक केलेल्या बँक खात्यांची माहिती दिवसातून फक्त २५ वेळा पाहता येईल. यामुळे अनावश्यक API कॉल कमी होतील आणि सिस्टम अधिक स्थिर होईल असं NPCI ला वाटत.
ऑटो-डेबिट पेमेंटसाठी टाइम स्लॉट- PhonePe Gpay New Rules
नेटफ्लिक्स, SIP आणि इतर सबस्क्रिप्शनसाठी ऑटो-डेबिट पेमेंट आता फक्त तीन निश्चित स्लॉटमध्ये केलं जाईल.
१) सकाळी १० वाजण्यापूर्वी
२) दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत
३) रात्री ९:३० नंतर
याचा परिणाम पीक अवर्समध्ये सर्व्हरच्या कार्यक्षमतेवर होणार नाही.
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे , जर तुमचे पेमेंट फेल झाले तर तुम्ही आता त्याची स्टेटस फक्त तीन वेळा तपासू शकाल. तसेच, दोनदा चेक करताना किमान ९० सेकंदांचे अंतर असेल. सर्व्हर लोड कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. हि नवीन मार्गदर्शक तत्त्वे (PhonePe Gpay New Rules) UPI सिस्टम जलद आणि अधिक विश्वासार्ह बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहेत. या नव्या नियमांमुळे भलेही सर्व सामान्य वापरकर्त्याला काही मर्यादांशी जुळवून घ्यावे लागेल, परंतु हे बदल डिजिटल पेमेंट अनुभव आणखी चांगला बनवणार आहेत.