Tuesday, July 22, 2025
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! उड्डाणानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं; कॉलेज कॅम्पसमध्ये गोंंधळ, जाळ अन्...

मोठी बातमी! उड्डाणानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं; कॉलेज कॅम्पसमध्ये गोंंधळ, जाळ अन् धुराचे लोट

भारतात एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात (Accident) घडल्याची दुर्घटना गेल्या महिन्यात घडली होती. अहमदाबादमधील या दुर्दैवी अपघातात जवळपास 260 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामध्ये, कॅबिन क्रू मेंबरच्या सर्वच स्टाफचा करुण अंत झाला होता.

 

आता, बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका येथे विमान कोसळल्याची (plane crash) दुर्घटना घडली आहे. बांगलादेश हवाई दलाचे F-7 BGI हे ट्रेनिंग जेट येथील एका शाळा आणि कॉलेजवर कोसळल्याने अनेकजण जखमी झाले आहेत. हे विमान (Airplane) चायना मेड असल्याची माहिती समोर आली असून पायलटांना ट्रेनिंग देण्यासाठीच हे जेट वापरले जात होते. दुर्दैवाने आज उड्डाण घेतल्यानंतर हे विमान खाली कोसळले.

 

ढाका येथील माइलस्टोन स्कूल आणि कॉलेजच्या परिसरात हे ट्रेनिंग विमान कोसळून एक जण ठार झाला असून 4 गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर तात्काळ मदतकार्य व बचावासाठी यंत्रणा पोहचली असून जखमींना जवळील रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. कॉलेज परिसरात विमान कोसळल्यानंतर जाळ आणि धूर संगटच निघाल्याचे चित्र व्हिडिओत पाहायला मिळत आहे. आज 21 जुलै 2025 रोजी दुपारी 1.06 वाजता ही विमान दुर्घटना घडली. टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच हे विमान कोसळले. या दुर्घटनेत विमानातील पायलटचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून दुर्घटनेनंतर चायना मेड F-7 BGI विमानाच्या सुरक्षेचा मुद्दा समोर येत आहे.

 

13 जुलै रोजी लंडनमध्येही विमान अपघात

 

दरम्यान, गेल्याच आठवड्यात लंडनमध्ये विमान कोसळल्याची एक धक्कादायक घटना घडली. लंडनच्या साऊथेंड विमानतळावर 13 जुलै रोजी धावपट्टीवरुन उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच हे विमान कोसळले होते. त्यानंतर, परिसरात आगीचे मोठे लोळ पाहायला मिळाले. अपघातग्रस्त विमान बीच बी 200 सुपरकिंग एअर होते. जे लंडनच्या साउथेंड विमानतळावरून नेदरलँड्समधील लेलीस्टॅडला उड्डाण करणार होते. या विमानाचा अंदाजे उड्डाण वेळ दुपारी 3.45 वाजताची होती. अपघातग्रस्त बीच बी 200 सुपरकिंग एअर हे ट्विन-इंजिन टर्बोप्रॉप विमान आहे. ते सुमारे 12 हवाई प्रवाशांना वाहून नेण्यास सक्षम असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -