Tuesday, July 22, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत बॉम्ब..? शहरात खळबळ 

इचलकरंजीत बॉम्ब..? शहरात खळबळ 

ताजी बातमी /ऑनलाइन टीम

इचलकरंजीत आज मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बॉम्ब ठेवल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. बॉम्ब ठेवलेले ठिकाण सांगली रोड परिसरातील गजबजलेल्या ठिकाणी म्हणजेच फॉर्च्यून प्लाझा असल्याचे सांगण्यात येत होतं.

 

ही बातमी ऐकताच शहरात फोनाफोनी सुरू झाली. तर काहींनी प्रत्यक्ष घटना स्थळाला भेट देण्यासाठी मोर्चा वळवला. दरम्यान सांगली रोड परिसरातील फॉर्च्यून प्लाझा परिसरात मोठी गर्दी उडाली. रस्त्यावरील ट्रॅफिक अचानक वाढल्याने वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झाली.

 

काही वेळातच पोलिसांचे पथक दाखल झाले. कसून शोधाशोध करण्यात आली. आणि नंतर समजलं की ही कोणत्याही प्रकारची अफवा किंवा खरी गोष्ट नसून पोलिसांनी मॉक ड्रिल टेस्ट घेतली होती. आणि त्यानंतर अनेकांनी सुटकेचा निस्वास घेतला. मात्र शहरात आज दिवसभर या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -