Tuesday, July 22, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात हे चाललंय काय! एकतर्फी प्रेम, हाती चाकू घेत मुलीच्या गळ्याला लावला,...

महाराष्ट्रात हे चाललंय काय! एकतर्फी प्रेम, हाती चाकू घेत मुलीच्या गळ्याला लावला, थरारक Video!

सातारा शहरातील धक्कादायक आणि चिंता निर्माण करणारा व्हिडिओ व्हायरल झाला. एकतर्फी मजनूने एका शाळकरी मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवला, तेव्हा संपूर्ण कॉलनी घाबरली.

 

लोक त्याला थांबवत होते, पण तो सर्वांना धमकी देत होता.

 

या घटनेनंतर संपूर्ण सातारा पोलिस प्रशासनासह महाराष्ट्रच हादरला, अन् लोक म्हणून लागले महाराष्ट्रात हे नेमकं चाललंय काय, येथे कायद्याची भीती राहिली नाही का, महाराष्ट्राचा बिहार झालाय काय, असा सवाल आता केला जात आहे,

 

नेमका काय घडला थरार!

 

एका अल्पवयीन शाळकरी मुलीला जबरदस्तीने पकडत, तिच्या गळ्याला चाकू लावून एका सनकी आशिकने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. ही घटना सातारा शहरात घडली. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं, सुदैवाने उमेश आडगळे नावाच्या व्यक्तीने पाठिमागून येत या माथेफिरू तरुणाच्या हातातील चाकू काढून घेत मुलीची सुटका केली. त्यानंतर, परिसरातील नागरिकांनी या तरुणास पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हल्ला करणारा युवकावर या कलमाअंतर्गत गुन्हा !

 

सुरुवातीला व्हायरल झालेल्या व्हिडिओवर असे वाटत होते की, हल्ला करणारा मुलगा हा अल्पवयीन असावा. परंतु, तो युवक अल्पवयीन नसून 18 वर्षे पूर्ण असल्याने त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीचे नाव आर्यन वाघमळे असून त्यास 18 वर्ष पूर्ण झाले आहेत. तो मूळ आरळे गावचा असून सध्या मोळाचा ओढा येथे वास्तव्यास आहे. सदर युवकावर पोलिसांनी पोक्सो कायदा, विनयभंग, दुखापत करणे आणि आर्म ऍक्ट कायद्यांतर्गत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

उमेश आडगळे बनला देवदूत

शाळकरी अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिला ठार मारण्याची धमकी हा सनकी युवक देत होता. त्यावेळी, तेथील जमावाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने काही ऐकलं नाही. घाबरलेली लहान मुलगी वाचवा-वाचवा म्हणत होती, मला सोड सोड असे देखील बोलत होती. त्या झटापटीमध्ये मुलीच्या गळ्याला देखील जखम झाली आहे.

 

दरम्यान, हे बघताच माथेफिरू युवकाच्या तावडीतून मुलीला वाचवायचे म्हणून उमेश आडगळे यांनी आपला जीव धोक्यात घालून धाडस केले, भिंतीच्या कठड्यावरुन आतमध्ये हळूवारपणे येत मुलाच्या हातातील चाकू काढून त्याला खाली पाडले. त्यामुळे, सुदैवाने मुलीला गंभीर दुखापत न होता, तिची सुटका झाली. उमेश हा तिच्यासाठी देवदूत ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -