जादा परताव्याचे आमिष दाखवत सांगलीतील किराणा व्यापाऱ्याची २० लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जयकुमार वर्मा, आकांक्षा चुवे आणि आमांसा अन्वी (पूर्ण पत्ता माहिती नाही) यांच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दीपचंद रिकवचंद लुकड (रा. टीव्हीएस शोरूमनजीक, माधवनगर रस्ता, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १९ ते ३० मे २०१५ या कालावधीत घडला. याबाबत माहिती अशी की, फिर्यादी लुकड यांचा किराणा माल विक्रीचा व्यवसाय आहे. १९ ते ३० मे २०१५ या कालावधीत संशयित तिघांनी त्यांच्याशी संपर्क करून ओळख वाढविली. त्यांना जादा परताव्याचे आमिष दाखविले. लुकड यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर संशयितांनी २२ लाख ५० हजार रुपये जमा करण्यास सांगितले
त्यानुसार लुकड यांनी रकम जमा केली. त्यातील १ लाख ६२ हजार रुपये संशयितांनी परतावा म्हणून तुकडयांना परत दिले. उर्वरिता २० लाख ८० हजारांची रक्कम देण्यास मात्र टाळाटाळ सुरू केली. तुकड यांनी रकमेसाठी सातत्याने पाठपुरावा केला, पण संशयितांनी त्यांना दाद दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लुकड यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तीनही संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.