Friday, July 25, 2025
Homeमहाराष्ट्रअहान-अनीतच्या 'सैयारा'समोर दिग्गजांनी गुडघे टेकले; सुपरफास्ट कमाईनं 'छावा'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर करणार?

अहान-अनीतच्या ‘सैयारा’समोर दिग्गजांनी गुडघे टेकले; सुपरफास्ट कमाईनं ‘छावा’च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर करणार?

अहान पांडे (Ahaan Panday) आणि अनित पड्डा (Aneet Padda) यांचा ‘सैयारा’ (Saiyaara Movie) हा चित्रपट आठवड्याच्या दिवसातही कमाल करतोय आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर (Indian Box Office) सातत्यानं आश्चर्यकारक कामगिरी करत आहे.

 

महत्त्वाची बाब म्हणजे, मोहित सुरी (Mohit Suri) दिग्दर्शित म्युझिकल ड्रामा असलेला रोमँटिक सिनेमा दररोज 20 कोटींहून अधिक कमाई करतोय. इतकंच नाही तर, या चित्रपटानं आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर अनेक मोठ्या सुपरस्टारच्या चित्रपटांना मागे टाकलं आहे. बुधवारी म्हणजेच, सहाव्या दिवशी तर, ‘सैयारा’नं बॉक्स ऑफिसवर छप्पडफाड कमाई केली आहे.

 

‘सैयारा’नं सहाव्या दिवशी किती कमाई केली?

 

नव्या स्टारकास्टच्या ‘सैयारा’नं प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. आठवड्याच्या दिवसांतच ‘सैयारा’ सिनेमा त्याच्या सुरुवातीच्या दिवसांपेक्षा जास्त कमाई करतोय. संध्याकाळच्या शोमध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येनं येत आहेत आणि थिएटरबाहेर हाऊसफुल बोर्ड लावलेले दिसतायत. बऱ्याच वर्षांनंतर, एखाद्या चित्रपटासाठी प्रेक्षकांची अशी क्रेझ पाहायला मिळतेय. यासोबतच, बॉक्स ऑफिसवर एखाद्या हिंदी सिनेमाला चांगले दिवस आल्यानं थिएटर मालकही खूप आनंदी असल्याचं पाहायला मिळतंय. ‘सैयारा’नं निर्मात्यांचं बजेट कधीच वसूल केलं असून आता ते फक्त नफा पैसे कमावत आहेत. ‘सैयारा’चं दररोजचं लाईफटाईम कलेक्शन तर एखाद्या वादळासारखं आहे.

 

दुसरीकडे, हा चित्रपट 2025 च्या चित्रपटांना एकामागून एक ज्या वेगानं मागे टाकत आहे ते पाहता, लवकरच ‘सैयारा’नं विक्की कौशलच्या ‘छावा’ सिनेमालाही मागे टाकलं तर, आश्चर्य वाटणार नाही. दरम्यान, ‘छावा’ चित्रपटाच्या 600 कोटींच्या कलेक्शनला मागे टाकण्यासाठी त्याला अजूनही अनेक कोटींची कमाई करावी लागणार आहे. या सगळ्यामध्ये, चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस रिपोर्टवर नजर टाकली तर, SACNILC च्या आकडेवारीनुसार

 

‘सैयारा’नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 21.5 कोटी, दुसऱ्या दिवशी 26 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 33.75 कोटी कमावले.

चित्रपटानं चौथ्या दिवशी 24 कोटी आणि पाचव्या दिवशी 25 कोटी कमावले.

सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सैयारा’नं रिलीजच्या सहाव्या दिवशी 21 कोटी कमावले आहेत.

यासह, ‘सैयारा’ची 6 दिवसांत एकूण कमाई आता 153.25 कोटी झाली आहे.

 

‘सैयारा’ 2025 च्या टॉप 5 फिल्म्समध्ये झाली सामील

 

‘सैयारा’ बॉक्स ऑफिसवर बुलेट ट्रेनपेक्षाही वेगानं कमाई करतेय आणि आपल्या धामाकेदार कमाईनं दररोज नवे विक्रम रचत आहे. रिलीजच्या सहाव्या दिवशी, हा चित्रपट अक्षय कुमारच्या स्काय फोर्सच्या 134.93 कोटींच्या कलेक्शनला मागे टाकत 2025 मधील पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. आता ‘सैयारा’चं पुढचं टार्गेट ‘सितारे जमीन पर’ (164.67 कोटी) आहे. आता ‘सैयारा’आणखी कोणकोणत्या सुपरस्टार्सचे रेकॉर्ड मोडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -