कुपवाड शहरातील रामकृष्ण नगर येथे पत्नीबद्दल अपशब्द वापराच्या रागातून वादावादीतून तिघांनी मिळून एका युवकाचा धारदार शस्त्राने निर्घुण खून केला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून दोन संशयितांन अटक करण्यात आली आहे. एक संशयित अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
मंगळवार दिनांक २२ जुलै रोजी रात्री दहा वाजता ते बुधवार २३ जुलैच्या सकाळी सात वाजणेच्या दरम्यान, रामकृष्णनगर येथील स्वामी समर्थ मंदिराजवळील परिसरात राहणान्या अमोल सुरेश रायते
(वय ३५) याचा खून करण्यात आला. त्याच्याच
परिचयाच्या तेजस संजय रजपूत प्रेम बाळासाहेब मद्रासी, आणि निहाल आसिफ बाबा या तिघांनी धारदार शस्त्रांनी वार करून खून केला व तेथून पसार झाले. बुधवारी पहाटे या खुनाची बातमी वान्यासारखी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर हे पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय स्णालयात पाठविण्यात आला.
यावेळी घटनास्थळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक आणि मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी भेट देत तपासाला गती देण्याचे निर्देश दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी
विशेष पथक तयार केले.
या खुनाचा तांत्रिक माहिती आणि खास बातमीदारांच्या मदतीने पोलिसांना दोन संशयीत आरोपी सावळी (ता. मिरज) येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ कारवाई करत प्रेम बाळासाहेब मद्रासी (वय २४) आणि तेजस संजय जपूत (वय २५) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान संशयित प्रेम मद्रासी याने कबुली दिली की, मयत अमोल रावते याने त्याच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने झालेल्या वादातून तिघांनी मिळून चाकू आणि कुन्हाडने वार करत अमोलचा खून केला असल्याचे सांगितले.
सध्या दोघा संशयितांना पुढील तपासासाठी एमआयडीसी कुपवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. फरार आरोपी निहाल बाबाचा शोध सुरू आहे. पुढील तपास कुपवाड पोलिस करत आहेत.