Friday, July 25, 2025
Homeइचलकरंजीखड्डयात पडून अडीच वर्षाच्या बालकाचा मृत्यू

खड्डयात पडून अडीच वर्षाच्या बालकाचा मृत्यू

जयसिंगपूर येथील शहरातील वरेकर कॉलनीत मोबाईल टॉवरसाठी काढलेल्या खात पडून रिदम महेंद्र राय या अडीच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. सदरची घटना बुधवारी दुपारी पडली. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली आहे.

बरेकर कॉलनीत चांदणे कुटुंबीयांच्या जागेवर इंडस कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. या टॉवरसाठी खोल खड्डा काढण्यात आला होता. या खड्यात पाणी

जयसिंगपूरमधील घटना

साचले होते. बुधवारी दुपारी अडीच वर्षाचा रिदम हा खेळत असताना खड्यात पडला, त्यामुळे त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान, रिदम याच्या आईचे येत्या शनिवारी ऑपरेशन असल्यामुळे ती सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय कागदपत्रे खवण्याकरीता गेल्या होत्या. त्या घरी दाखल झाल्यानंतर आईचा व त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदयपिळून टाकणारा होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -