आळते (ता. हातकणंगले) येथील साठेनगर मध्ये पिंटू बापूसो कांबळे यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून २ लाख ११ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. चोरीमध्ये सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे टॉप्स, सोन्याच्या मोत्याचा हारसह रोख पंधरा हजार रुपये रोख रक्कमेचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट तोडून मुद्देमाल चोरून नेला असून, याबाबतची फिर्याद पिंटू कांबळे यांनी दिली आहे. पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.