Saturday, July 26, 2025
Homeमहाराष्ट्रतिरुपती बालाजीला दान म्हणून आलेल्या मोबाईलचा होणार लिलाव, कसा प्राप्त कराल ?

तिरुपती बालाजीला दान म्हणून आलेल्या मोबाईलचा होणार लिलाव, कसा प्राप्त कराल ?

ध्र प्रदेशातील टीटीडी (तिरुमला तिरुपतीदेवस्थानम) आपल्या भक्तांना आगळी वेगळी संधी मिळणार आहे. तिरुपती बालाजी मंदिरासह अन्य अनेक मंदिरात दरवर्षी भक्त दान म्हणून मोबाईल फोनही दान करीत असतात. या फोनचा आता लिलाव करण्याचा निर्णय तिरुमला तिरुपतीदेवस्थानमने घेतला आहे. या मोबाईल फोनची ऑनलाईन लिलाव येत्या ४ आणि ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. यातील वापरलेले आणि आंशिक रुपाने क्षतिग्रस्त झालेल्या मोबाईलची विक्री केली जाणार आहे.

 

क्षतिग्रस्त (73) मोबाइल विकले जाणार

टीटीडी अर्थात तिरुमाला तिरुपती देवस्थानम हा आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराचे व्यवस्थापन पाहाणारा एक ट्रस्ट आहे. तिरुपती बालाजी मंदिराला दरवर्षी देश आणि विदेशातून लाखो भक्त पोहचत असतात. हे भक्त आपल्या नवसाप्रमाणे रोख रक्कम, सोने- चांदी, हिरे-मोती आणि अन्य किमती सामान दान म्हणून बालाजीच्या चरणी वाहात असतात. यात काही भक्त असेही आहेत जे मोबाईल फोन दान करत असतात.

 

दानात आलेल्या मोबाईल फोनची विक्री

तिरुमला तिरुपतीदेवस्थानम आता या भक्तांनी दिलेल्या मोबाईल फोनचा लिलाव करण्याची योजना आखली आहे. आंध्रप्रदेश राज्य सरकारच्या ई-प्रोक्योरमेंट पोर्टलच्या माध्यमातून या फोनचा ई-लिलाव होणार आहे. ई- लिलावात कार्बन, एलआयएफ, नोकिया, सॅमसंग, लावा, आयटेल, लेनोवो, फिलीप्स, एलजी, सॅन्सुई, ओप्पो,पोको, एसर, पॅनॉसॉनिक , ऑनर, वन प्लस, ब्लॅकबेरी, जिओनी, मायक्रोसॉफ्टस असुस, कुलपॅड, एचडीसी,मोटोरोला,टेक्नॉ, इन्फिनिक्स, रियलमी, हुआवेई, सेलकॉन, विनो, मायक्रोमॅक्स आणि अन्य कंपनीच्या मोबाईलची ऑनलाईन विक्री होणार आहे.

 

ई-प्रोक्योरमेंट पोर्टलवर करावे लागणार रजिस्ट्रेशन

ई-लिलावात भाग घेण्यासाठी इच्छुकांना आंध्र प्रदेश सरकारच्या ई-प्रोक्योरमेंट पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असणार आहे.टीडीपीने सांगितले की भक्त ई-लिलावा संदर्भात अधिक माहितीसाठी टीटीडीच्या वेससाईटला www.tirumala.org भेट देऊ शकतात. तसेच ई-लिलाव पोर्टल https://konugolu.ap.gov.in वर माहिती मिळवू शकतात. वा 0877-2264429 नंबरवर कॉल करु शकतात.

 

मंदिरात दानात मिळणाऱ्या मोबाईलचा ई – लिलाव होणार असल्याने भक्त खूप आनंदी आहेत. मोठ्या संख्येने भक्त या लिलावात सामील होण्याची शक्यता आहे. मोबाईलचा ई-लिलाव ४ ते ५ ऑगस्ट असेल. ज्यात कोणीही सहभाग घेऊ शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -