Saturday, July 26, 2025
Homeमहाराष्ट्रRealme 15 Series : 7,000mAh बॅटरी, भन्नाट AI फीचर्ससह Realme ने लाँच...

Realme 15 Series : 7,000mAh बॅटरी, भन्नाट AI फीचर्ससह Realme ने लाँच केले 2 नवे 5G मोबाईल

प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Realme ने भारतीय बाजारपेठेत २ नवे ५G मोबाईल लाँच केले आहेत. Realme 15 Pro 5G आणि Realme 15 5G असं या दोन्ही स्मार्टफोनची नावे आहेत. दोन्ही स्मार्टफोनची खास बाब म्हणजे यामध्ये तब्बल 7,000mAh ची पॉवरफुल बॅटरी बसवण्यात आली आहे तसेच तुम्हाला AI फीचर्सचाही लाभ घेता येईल. आज आपण या दोन्ही मोबाईलचे खास स्पेसिफिकेशन आणि किमती याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

 

Realme 15 5G –

Realme 15 5G मध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह 6.8-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2,800×1,280 पिक्सेल रिझोल्युशन, 2,500Hz इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेट, 6,500 nits पर्यंत लोकल पीक ब्राइटनेस मिळतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i चे प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 7300+ चिपसेट बसवण्यात आली असून हा स्मार्टफोन Android 15-आधारित Realme UI 6 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. Realme 15 5G मध्ये 50-मेगापिक्सेल चा मुख्य कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-अँगलसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 7,000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Realme 15 Series

 

किंमत किती-

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Realme 15 5G च्या ८ GB+ १२८ GB मॉडेलची किंमत २५,९९९ रुपये आहे. तर ८ GB + २५६ GB स्टोरेजची किंमत २७,९९९ रुपये आणि १२ GB + २५६ GB व्हेरिएंटची किंमत ३०,९९९ रुपये आहे.

 

Realme 15 Pro 5G- Realme 15 Series

Realme 15 Pro 5G मध्ये सुद्धा 144Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह 6.8-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2,800×1,280 पिक्सेल रिझोल्युशन, 2,500Hz इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेट, 6,500 nits पर्यंत पीक ब्राइटनेस मिळतो. Realme 15 Pro 5G मध्ये Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन सुद्धा Android 15-आधारित Realme UI 6 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. फोटोग्राफीसाठी, Realme 15 Pro 5G मध्ये 50-मेगापिक्सेल Sony IMX896 मुख्य कॅमेरा, 50-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेलचाच सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्येही पॉवरसाठी 7,000mAh बॅटरी असून हि बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

 

 

किंमत किती?

 

Realme 15 Pro 5G ची च्या 8GB + 128GB स्टोरेज मोबाईलची किंमत 31,999 रुपयांपासून सुरू होते. तर ८ GB+ २५६ GB मॉडेलची किंमत ३३,९९९ रुपये, १२ GB + २५६ GB स्मार्टफोनची किंमत ३५,९९९ रुपये आणि १२ GB + ५१२ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३८,९९९ रुपये आहे (Realme 15 Series)

 

Realme 15 Pro 5G आणि Realme 15 5G या दोन्ही स्मार्टफोनमध्ये AI MagicGlow 2.0, AI Landscape, AI Glare Remover, AI Motion Control , AI Snap Mode, AI Edit Genie आणि AI Party सारखे फीचर्स मिळतात. हे दोन्ही मोबाईल हिरव्या आणि सोनेरी रंगात लाँच करण्यात आले आहेत. तुम्ही येत्या ३० जुलैपासून रिअलमी इंडिया वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधून हे स्मार्टफोन खरेदी करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -