Saturday, July 26, 2025
Homeइचलकरंजीपंचगंगेच्या पातळीत अडीच फुटांनी वाढ, राधानगरी धरण ९६ टक्के भरले

पंचगंगेच्या पातळीत अडीच फुटांनी वाढ, राधानगरी धरण ९६ टक्के भरले

गेल्या चार दिवसांपासून विश्रांती दिलेल्या पावसाने जिल्ह्यात आज जोरदार हजेरी लावली.(dam)शहरात हलक्या सरी कोसळल्या, तर गेल्या चोवीस तासांत धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात तब्बल अडीच फूट वाढ झाली. दरम्यान, अद्याप आठ बंधारे पाण्याखाली आहेत.म्‍हाताऱ्या पावसाचे नक्षत्र गेल्या पाच दिवसांपूर्वी निघाले आहे. परंतु, पावसाचा जोर काही दिसला नाही. काल रात्रीपासून अचानक पावसाच्या जोरदार सरी जिल्ह्यात सर्वत्र कोसळल्या. आज सकाळी शहरातही हलक्या सरी पडल्या. दिवसभरात अधूनमधून अशा सरी कोसळत राहिल्या. दरम्यान, जिल्ह्यातील धरण क्षेत्रांत गेल्या चोवीस तासांत अतिवृष्टी झाली.

 

यामध्ये कुंभी, घटप्रभा, पाटगाव, कासारी, धामणी, कोदे आदी धरण क्षेत्रांत ६५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडला. यामुळे नद्यांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. (dam)सकाळी १८ फूट असणारी पंचगंगेची पाणी पातळी रात्री २० फूट सहा इंचांवर पोहोचली. अद्याप पंचगंगेवरील राजाराम बंधाऱ्यासह सहा, दूधगंगा नदीवरील एक, वारणा नदीवरील दोन बंधारे पाण्याखाली आहेत.आलमट्टी धरण ८०.९३ टक्के धरण भरले असून, त्यातून ४२ हजार ५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे, तर कोयना धरण ७२.८१ टक्के भरले असून, ११ हजार ४०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. पावसामुळे एका घराची भिंत कोसळून ३० हजारांचे नुकसान झाले. जिल्ह्यात आतापर्यंत ४१४ मालमत्तांचे सुमारे एक कोटी ५१ लाख १५ हजार ९५० रुपयांचे नुकसान झाले.

 

राधानगरी तालुक्यात संततधार पावसामुळे राधानगरी धरण येत्या दोन-तीन दिवसांत केव्हाही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. हे धरण आज ९६ टक्के इतके भरले असून, आता दोन फुटांची पाणी पातळी कमी आहे. आज सकाळपर्यंत धरण क्षेत्रावर ५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर आज दिवसभरात २६ मिलिमीटर पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक सुरू असल्याने पाण्याची पाणी संचयात वाढ सुरू आहे. (dam)आज धरणाची पाणीपातळी ३४५.७० फूट इतकी झाली असून, स्वयंचलित दरवाजे खुले होण्यासाठी दोन फुटांची पाणी पातळी कमी आहे. दरम्यान, काळम्मावाडी धरणाच्या सांडवा पाणी पातळीपर्यंत अर्धा मीटर पाण्याची गरज आहे. हे धरण १९.५० टीएमसी इतके भरले आहे.

 

शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील परळे निनाई येथील कडवी मध्यम प्रकल्प गुरुवारी सकाळी सहा वाजता शंभर टक्के भरला. गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात ५४ मिमी पाऊस झाला. कडवी धरणाची पाणी साठवण क्षमता २.५१ टीएमसी आहे. धरणाची पाणीपातळी ६०१.२५ मीटर, तर ७१.२४० दलघमी पाणीसाठा आहे.धरण पाणलोट क्षेत्रात तीन हजार ते साडेतीन हजार मिमी इतका पाऊस पडतो. या धरणाचा परळे निनाई, भेंडवडे, लोळाणे, पुसार्ळे, आळतूर, वारूळ, करुंगळे, निळे, कडवे, येलूर, पेरीड, भोसलेवाडी, गाडेवाडी, मलकापूर, कोपार्डे, सांबू, शिरगाव, ससेगाव, सावर्डे, मोळवडे, सवते, शिंपे, पाटणे या २२ गावांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वापर होतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -