सध्या एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लोणावळ्यात एका तरुणीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर येत आहे… सतत महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येत असल्यामुळे महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. आता देखील असंच काही झालं आहे. लोणावळ्यात स्थानिक तरुणीवर अत्याचार झाले आहेत. तरुणीवर गाडीत बलात्कार झाल्याचं उघड झालं आहे. ज्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. लोणावळ्यातील एका स्थानिक तरुणीवर कारमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीला लोणावळा परिसरातून जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिच्यावर गाडी थांबवत वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आले. त्यानंतर आरोपीने तिला सामसूम असलेल्या रस्त्याच्या कडेला टाकून दिलं.
याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, एक आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेय तर इतर दोन नराधमांचा शोध सुरुये. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांनी आरोपीला 12 तासांत अटक केलं आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत असून, धक्कादायक घटनेनंतर नागरिकांध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सांगायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी पुण्यातील स्वारगेट येथे देखील एक धक्कादायक घटना घडली. 26 वर्षीय तरुणीवर एका नराधमाने बसमध्ये बलात्कार केला. आरोपी दत्ता गाडे याने तरूणीला फसवून दुसऱ्या बसमध्ये नेलं आणि तिथे तिच्यावर एकदा नव्हे दोनदा अत्याचार केला, त्यानंतर तो फरार झाला. अनेक तासांच्या शोधमोहिमेनंतर पोलिसांनी त्याला त्याच्या गुणाट गावातून बेड्या ठोकून अटक केली. याप्रकरणामुळे देखील वातावरण तापलं होतं.
एवढंच नाही तर, तीन दिवसांपूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याने पिस्तूलचा धाक दाखवत महिलेवर सतत अत्याचार केल्याची माहिती देखील समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आणि महिलेची ओळख झाली, कालांतराने ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने पिस्तूलचा धाक दाखवत महिलेवर अनेकदा अत्याचार केल्याची माहिती समोर आली.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे देशाच्या कोणत्याच कोपऱ्या महिला सुरक्षित नाहीत… असं चित्र दिसून येत आहे. पोलिसांकडून महिलांवर अत्याचार होत असतील तर पोलीस कर्तव्य विसरलेत असं म्हणायला हरकत नाही?