Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रफुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

हल्ली बाजारात जाताना रोख रक्कम बरोबर नसली तरी तुमचं काही बिघडत नाही. कारण मोबाईल द्वारे युपीआय पेंमेन्ट करुन खरेदी करणं सोप्पं झालंय. रोख आणि चिल्लर बाळगण्याची कटकट जरी कमी झाली तरी युपीआयनं व्यवहारांची संख्या मात्र वेगानं वाढलीये.

 

गेल्या दोन वर्षांत दररोजचे UPI व्यवहार ६० कोटींच्या पुढे गेलेत. यामुळे बँक, पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर आणि NPCI यांच्यावर ताण वाढलाय. तसंच या व्यवहारांमधून सरकारला कोणतेही थेट उत्पन्नही मिळत नाही म्हणून आरबीआयनं नियमांमध्ये बदल केलेत.

 

UPI व्यवहारांचा वेग झपाट्यानं वाढतोय, त्यामुळे हा आर्थिक मॉडेल फार काळ शाश्वत राहू शकत नाही. हे ही तितकंच खरंय. 1 ऑगस्ट 2025 पासून भारतीय राष्ट्रीय पेमेंट महामंडळानं UPI सिस्टम अधिक विश्वासार्ह, जलद करण्यासाठी काही नवे नियम जाहीर केले आहेत.

 

1 ऑगस्टपासून UPIचे नियम बदणार

 

UPI अॅपवरून दिवसातून फक्त 50 वेळा बॅलन्स तपासू शकाल

 

मोबाईलशी लिंक खात्यांची यादी दिवसातून 25 वेळा पाहता येईल

 

दिवसातून 3 वेळाच अयशस्वी व्यवहाराची स्थिती तपासू शकाल

 

नेटफ्लिक्स, म्युच्युअल फंड हप्ते, ऑटो पे व्यवहार फक्त 3 वेळा होतील

 

सकाळी 10 वाजण्यापूर्वी दुपारी 1 ते 5 आणि रात्री 9.30 नंतर

 

अनेकांना GPay, PhonePe, Paytmचा सर्रास वापर करुन खर्च करणाऱ्यांची सवय लागली होती. परंतू भविष्यात UPI व्यवहारांसाठी पैसे लागणार असल्यानं ग्राहकांच्या खिशावरच त्याचा भार पडणार हे निश्चित. त्यामुळे आता ऑनलाईन व्यवहारांवर लगाम घालण्याची वेळ आलीये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -