धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसाने तसेच धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाटयाने वाढ होत आहे. रविवारी दिवसभरात तब्ब अडीच फूट पाणी पातळी वाढली. यामुळे लहान पुल सकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून हुपरी, कागलकडे जाणारी वाहतूक आता मोठ्या पुलावरून सुरू आहे.
जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. त्याचबरोबर धरण पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे राधानगरी धरण भरले असून काही स्वयंचलित दरवाजातून पाणी भोगावती नदीपात्रात जात आहे. त्याबरोबर काळम्मावाडी धरण ८२ टक्के भरले असून येथून ३५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याने प्रशासनाने नदीकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
(पंचगंगा नदीचे पाणी लहान पुलाला लागले असल्याने या पुलावरील वाहतूक बंद करताना महापालिका आप्तकालीन पथकाचे कर्मचारी. छाया-मयूर चिदे)
संततधार पाऊस आणि धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. रविवारी सकाळी ५५.३ फूट इतकी पाणी पातळी होती. सायंकाळी सात वाजेपर्यंत अडीच फूटाने पाणी वाढून ५७ फूट ९ इंच इतकी झाली आहे. सध्या लहान पुलाला पाणी घासू लागले आहे. त्यामुळे सकाळी लहान पुलावरील वाहतूक महानगरपालिकेच्या आपत्कालीन
पथकाने बंद केली. यामुळे हुपरी, कागलक जाणारी वाहतूक सध्या मोठ्या पुलावरू सुरु आहे. पंचगंगेची इशारा पातळी ६८ पृ तर धोका पातळी ७१ फूट इतकी आहे. पाण बाढीचा वेग असाच राहिल्यास रात्री लहा पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामु आमकालीन पथकाचे प्रमुख संजय कांब यांचेसह त्यांचे सहकारी कर्मचारी संभार परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.