Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंग1 ऑगस्टपासून बदलतील ‘हे’ नियम, थेट परिणाम होणार तुमच्या खिशावर

1 ऑगस्टपासून बदलतील ‘हे’ नियम, थेट परिणाम होणार तुमच्या खिशावर

1 ऑगस्ट 2025 पासून देशातील दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. काही वस्तूंच्या किमती महागतील, तर काही वस्तू स्वस्त देखील होऊ शकतात. तुम्ही दिवसभर UPI द्वारे व्यवहार करत असाल, SBI क्रेडिट कार्ड बाळगत असाल किंवा दरमहा LPG सिलिंडरची वाट पाहत असाल, तर या सर्व बाबींवर नियम बदलणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI), बँकिंग नियामक RBI आणि तेल कंपन्यांकडून येणाऱ्या या बदलांबद्दल सतर्क राहणे महत्त्वाचे आहे.

 

UPI वर नवीन मर्यादा येणार: 1 ऑगस्टपासून UPI वापरण्याच्या नियमांमध्ये अनेक नवीन बदल लागू केले जातील. आता जर तुम्ही दिवसभर Paytm, PhonePe किंवा Google Pay यांसारख्या अॅप्सद्वारे व्यवहार करत असाल तर या मर्यादा लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

 

दिवसातून फक्त 50 वेळा शिल्लक तपासता येणार: एका UPI ॲपवर मोबाईल नंबरशी लिंक केलेले बँक खात्यातील रक्कम दिवसातून फक्त 25 वेळा पाहता येते. OTP व्यवहार आता फक्त तीन निश्चित वेळेत प्रक्रिया केले जातील: सकाळी 10 वाजण्यापूर्वी, दुपारी 1 ते संध्याकाळी 5 आणि रात्री 9.30 नंतर…

 

जर तुम्ही SBI को-ब्रँडेड क्रेडिट कार्डधारक असाल, तर ऑगस्टपासून तुमच्या मोफत विमा कव्हरमध्ये मोठा बदल होणार आहे. SBI ने अनेक ELITE आणि PRIME कार्ड्सवर उपलब्ध असलेले विमान अपघात विमा कव्हर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी, या कार्ड्सना 50 लाख ते 1 कोटी पर्यंतचे विमा संरक्षण मिळत होते, परंतु आता ही सुविधा बंद केली जाईल. हा बदल SBI-UCO, सेंट्रल बँक, करूर वैश्य बँक आणि PSB च्या पार्टनर कार्ड्सना लागू असेल.

 

दरवर्षीप्रमाणे, यावेळीही 1 ऑगस्ट रोजी घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो. जुलैमध्ये व्यावसायिक सिलिंडर 60 रुपयांनी स्वस्त झाले, परंतु घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती स्थिर राहिल्या. यावेळी घरगुती ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. जर किमती कमी झाल्या तर महागाईशी झुंजणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी असू शकते.

 

तेल कंपन्या अनेकदा महिन्याच्या पहिल्या दिवशी सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींमध्ये बदल करतात. पण, एप्रिलपासून त्यात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मुंबईत सीएनजीच्या किमती 79.50 प्रति किलो आणि पीएनजी 49 प्रति युनिट होत्या. आता ऑगस्टमध्ये काही बदल होतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

आरबीआय चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) ची बैठक 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान होणार आहे, ज्यामध्ये व्याजदरांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा बैठकीनंतर दरांमध्ये बदल जाहीर करू शकतात, ज्यामुळे गृहकर्ज, कार कर्ज आणि ईएमआयवर परिणाम होऊ शकतो… असे देखील सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -