Monday, July 28, 2025
Homeमहाराष्ट्रअधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य

अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई’; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणच्या (म्हाडा) मुबंई विभागात कार्यरत असलेले उपनिबंधक बापू कटरे यांच्या पत्नी रेणू कटरे यांनी आत्महत्या केली.

 

राहत्या घरातच त्यांनी गळफा घेतला. शिक्षिका असलेल्या रेणू कटरे आत्महत्या प्रकरणात खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. बापू कटरे हे महिन्याला ४० ते ५० लाख कमाई करत होते. या काळ्या कमाईला रेणू वैतागल्या होत्या. कारण हा काळा पैसा पांढरा करण्यासाठी रेणू यांच्या वडिलांवर दबाव टाकला जात होता, असा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी रेणू कटरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बापू कटरे आणि त्यांच्या आई यमाबाई कटरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

म्हाडा अधिकारी महिन्याला कमवायचा ४०-५० लाख काळा पैसा

 

मुंबईतील समता नगर पोलीस ठाण्यात उपनिबंधक बापू कटरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. मयत रेणू कटरे यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. रेणू यांच्या भावाने असा दावा केला आहे की, म्हाडात अधिकारी असलेले बापू कटरे महिन्याला ४०-५० लाख रुपये अवैध मार्गाने कमावत होते.

 

रेणू कटरे यांचा अवैध मार्गाने पैसे कमवण्याला विरोध होता. वाममार्गाने आलेल्या पैशांचा मुलांवर वाईट परिणाम होईल अशी बहीण बापू कटरे यांना म्हणायची. अवैध मार्गाने मिळवलेला पैसा पांढरा करण्यासाठी बापू कटरे माझ्या वडिलांवर दबाव आणायचा. नकार दिल्यानंतर रेणूला मारहाण करायचे, असा आरोप रेणू कटरे यांच्या भावाने केला आहे.

 

रेणू कटरे यांनी आत्महत्या का केली?

 

तक्रारीनुसार, दबाव आणि मारहाणीच्या भीतीमुळे रेणू कटरे यांनी १५ ते २० लाख रुपये पांढरे करण्यास मदत केली. यासंदर्भात रेणू कटरे यांचे वडील बापू कटरेंना भेटून बोलणार होते. यासाठी पुण्यात बापू कटरेंना भेटण्यासाठी बोलावले गेले होते. पण, त्यांनी नकार दिला. त्यामुळे रेणू कटरे या नाराज झाल्या आणि त्यांनी घरातच आत्महत्या केली.

 

आत्महत्येपूर्वी रेणू कटरेंनी कुणाला केला होता कॉल?

 

या प्रकरामुळे रेणू कटरे यांची मानसिक धैर्य खचले होते. २७ जुलै रोजी दोन्ही कुटुंबीयांची बैठक बोलावली गेली होती. या बैठकीला बापू कटरे यांनी बैठकीला येण्यास नकार दिला. त्यामुळे २६ जुलै रोजी रेणू यांनी त्यांच्या भावाला कॉल केला. ‘बापू कटरे विनाकारण मारहाण आणि शिवीगाळ करत आहे. बैठकीला येण्यासही नकार देत आहे. माझा हा त्रास कधीच थांबवणार नाही’, असे सांगून त्यांनी कॉल बंद केला.

 

त्यानंतर रेणू यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरला कॉल केला. पती आणि सासू माझा छळ करत आहेत, असे सांगत त्यांनी कॉल बंद केला. फॅमिली डॉक्टरने रेणू यांच्या आईवडिलांना कॉल केला, पण त्यांचा कॉल लागला नाही. रेणू यांना परत कॉल केला, तेव्हा त्यांनीही कॉल घेतला नाही.

 

दरम्यान, माहेरी याबद्दल सांगण्यात आल्यानंतर रेणू कटरे यांचे आई-वडील आणि कुटुंबीय पुण्यावरून मुंबई येण्यास निघाले. पुण्याहून मुंबईत घरी आले असता त्यांना रेणूने आत्महत्या केली असल्याचे कळले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -