१५ वर्षावरील (एमएच ०९) असणाऱ्या दुचाकी वाहनाचे पासिंग इचलकरंजी मधील प्रादेशिक कार्यालयात सुरू करावे अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा चालक संघटना व विद्यार्थी वाहतूक संघटना इचलकरंजी यांच्यावतीने एका निवेदनाव्दारे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात ज्या १५ वर्षावरील (एमएच ०९) असणान्या दुचाकी गाड्धाची मुदत संपली आहे. अशा दुचाकी गाड्याचे रिपासिंग करण्याकरीता कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयामध्ये जावे लागते. वा दुचाकी गाड्याची नोंदणी व कागदपत्रे कोल्हापूर कार्यालयामध्ये आहे. वाहनधारकांना पासिंगला येणारा खर्च व कोल्हापूरला येणे-जाणेचा त्रास त्यामध्ये कामाची खोटी त्यामुळे दुचाकी मालकांना त्रास सहन करावा लागतो.
इचलकरंजी येथे प्रादेशिक कार्यालय सुरू आहे. तेव्हा हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील दुचाकीचे पासिंगची सोय उपलब्ध करून वाहनधारकांना दिलास द्यावा अशी मागणी केली आहे.
निवेदनावर रामचंद्र जाधव, शिवाजी साळुंखे, आशिफ नांद्रे, मन्सूर सावनूरकर, संजय ढोले आदिच्या स्वाक्षरी आहेत.