Thursday, July 31, 2025
Homeमहाराष्ट्रशॉकिंग! जेवणासाठी 'थांबा' घेतलेल्या बसमधील प्रवाशाला मारहाण, 95 लाखांचं सोनं पळवलं; चौघे...

शॉकिंग! जेवणासाठी ‘थांबा’ घेतलेल्या बसमधील प्रवाशाला मारहाण, 95 लाखांचं सोनं पळवलं; चौघे पळाले 1 ताब्यात

राज्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढ होत असून दिवसाढवळ्या दरोड्याच्या घटना घडत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड (Karad) तालुक्यातील तासवडे टोलनाका परिसरात असणाऱ्या श्रावणी हॉटेल येथे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मारहाण करत सोन्याच्या (Gold) दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरहून मुंबईला निघालेली एसटी बस (ST) येथील टोलनाक्याजवळी हॉटेलवर थांबलेली होती. त्यावेळी, चार ते पाच अज्ञातांनी कुरिअर गोल्ड पॅकिंगचा माल घेऊन धूम ठोकली. सुदैवाने जमावाने एका संशयितास पकडून पोलिसांच्या स्वाधान केलं आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

 

पुणे-बंगळुरू महामार्गावर कराड जवळील टोलनाका परिसरात असलेल्या हॉटेल श्रावणीजवळ ही खळबळजनक घटना घडली. याठिकाणी अनोळखी तीन ते चार संशयितांनी एसटीतून प्रवास करणाऱ्या कोल्हापूरमधील प्रशांत कुंडलिक शिंदे यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या ताब्यातील कृष्णा कुरिअर कासार गल्ली कोल्हापूर येथील कुरियर गोल्ड पॅकिंग असलेला माल घेऊन हे चौघे पळून गेले आहेत. या बॅगमध्ये 35 हजार रुपये रोकड आणि सोन्याचे दागिने असलेले लहान लहान 20 डब्बे ठेवलेले होते, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.

 

येथील परिसरात मारहाण केल्यानंतर संशयितांनी कारमधून साताऱ्याच्या दिशेने पलायन केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या घटनेवेळी एका संशयिताला जमावाने पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही तळबीड पोलीस ठाण्यात सुरू आहे. त्यानुसार, प्रशांत कुंडलिक यांच्याकडून जबाब व तक्रार नोंद करुन घेतली जात आहे. दरम्यान, दिवसाढवळ्या झालेल्या लुटीमुळे आणि मारहाणीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -