Thursday, July 31, 2025
Homeब्रेकिंगलाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचे 1500 रुपये लवकरच येणार, 2984 कोटी वर्ग,...

लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचे 1500 रुपये लवकरच येणार, 2984 कोटी वर्ग, शासन निर्णय जारी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या महिला व बाल विकास विभागानं शासन निर्णय जारी करुन जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे.

 

हा शासन निर्णय 30 जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. लाडक्या बहिणींना या योजनेतून दरमहा 1500 रुपये दिले जातात.

 

जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी वर्ग

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै 2024 पासून सुरु केली आहे. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीयोजने तील लाभार्थी शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये दिले जातात. जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी 2984 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती शासन निर्णयात देण्यात आली आहे.

 

महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना निधीचं वितरण करण्यासाठी 28290 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी 2984 कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यापोटी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वर्ग करण्यास सरकारनं मंजुरी दिली असल्यानं जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींना येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.

 

महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ काही पुरुषांनी घेतल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकची माहिती दिली होती. आदिती तटकरे यांनी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 26.34 महिला अपात्र असून देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्याचं सांगितलं होतं. जून महिन्यापासून त्या लाभार्थ्यांचा लाभ स्थगित करण्यात आल्याचंदेखील आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं होतं. जून महिन्याचा हप्ता 2 कोटी 25 लाख महिलांना दिल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली. छाननीनंतर अपात्र लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्यात येत असल्यानं प्रत्येक महिन्यात शासनाला प्रत्येक महिन्यासाठी खर्च करत असताना त्यात घट होत असल्याचं पाहायला मिळतं.

 

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना येत्या दोन ते तीन दिवसात जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता वर्ग केला जाऊ शकतो. लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा म्हणजेच योजना सुरु झाल्यापासून 13 वा हप्ता मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -