Friday, August 1, 2025
Homeइचलकरंजीबंद घर फोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास 

बंद घर फोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास 

यड्राव (ता. शिरोळ) येथील रेणुकानगरमधील बंद घराचा कड़ी कोयंडा उचकटून चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रकम असा १ लाख २० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी चाँदवी सलीम मसुते (वय ३८ रा. यड्राव) यांनी शहापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, चाँदबी मसुते या पार्वती औद्योगिक वसाहतीत नोकरी करतात. मंगळवारी रात्री त्या कामावर गेल्या होत्या. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. बुधवारी सकाळी त्या घरी परतल्या असता घराचे कुलूप काढलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता तिजोरीत ठेवलेले सोन्याचे एक तोळ्याचे गंठण, अर्घा तोळ्याची कर्णफुले, अंगठी आणि रोख ३० हजार रुपये असा १ लाख २० हजाराचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. अधिक तपास सहाय्यक फौजदार अविनाश मुंगसे हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -