अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि अनेक देशांवर कर लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 ते 41 टक्क्यांपर्यंतच्या कर लादण्याचा आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे अमेरिकेला आर्थिक सुरक्षा मिळेल आणि वर्षानुवर्षे सुरू असलेला व्यापारातील असमतोलही दूर होईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
नवीन टॅरिफनूसार भारतातून होणाऱ्या निर्यातीवर 25%, तैवानमधून येणाऱ्या वस्तूंवर 20% आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या वस्तूंवर 30% टॅरिफ समाविष्ट आहे. पाकिस्तानवर 19 टक्के आणि जपानवर 15 टक्के टॅरिफ लादण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इस्रायलवर 15 टक्के आणि इराकवर 35 टक्के टॅरिफ लादण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेवर 30 टक्के, दक्षिण कोरियावर 15 टक्के आणि श्रीलंकेवर 20 टक्के टॅरिफ लादला आहे.
नवीन टॅरिफ दर कधी लागू केला जाईल?
व्हाईट हाऊसने जारी केलेल्या तथ्य पत्रकात म्हटले आहे की नवीन टॅरिफ दर 1 ऑगस्टपासून लागू केला जाणार आहे. ट्रम्प यांनी कॅनडासाठी एक वेगळी प्रणाली तयार केली आहे. रॉयटर्सच्या मते, कॅनडावर 35 टक्के टॅरिफ लादण्यात आला आहे. तो आधी 25 टक्के होता. कॅनडा बेकायदेशीर औषध संकट थांबवण्यात अपयशी ठरला असं कारण अमेरिकेकडून देण्यात आले आहे.
कोणत्या देशावर किती टॅरिफ?
अफगाणिस्तान -15%
अल्जेरिया – 30%
अंगोला -15%
बांगलादेश – 20%
बोलिव्हिया – 15%
बोस्निया आणि हर्जेगोविना -30%
बोस्निया आणि हर्जेगोविना – 15%
बोत्स्वाना – 15%
ब्राझील – 10%
ब्रुनेई – 25%
कंबोडिया -19%
कॅमेरून – 15%
इक्वेडोर 15%
इक्वेटोरियल गिनी 15%
घाना – 15%
गयाना 15%
आइसलँड 15%
भारत 25%
इंडोनेशिया 19%
इराक 35%
इस्राएल 15%
जपान 15%
जॉर्डन 15%
कझाकस्तान – 25%
लाओस 40%
लेसोथो 15%
लिबिया 30%
लिक्टेंस्टाइन – 15%
मादागास्कर – 15%
मलावी 15%
मलेशिया 19%
म्यानमार 40%
नामिबिया 15%
नौरू 15%
न्यूझीलंड 15%
निकाराग्वा 18%
नायजेरिया 15%
पाकिस्तान 19%
दक्षिण आफ्रिका – 30%
दक्षिण कोरिया – 15%
श्रीलंका – 20%
स्वित्झर्लंड – 39%
सीरिया 41%
तैवान 20%
थायलंड 19%
तुर्की 15%
व्हिएतनाम – 20%
झिम्बाब्वे – 15%
डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानशी हातमिळवणी करून भारताला धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (31 जुलै) सोशल मीडियाद्वारे सांगितले की अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये एक करार झाला आहे. या अंतर्गत, दोन्ही देश तेल साठ्यांच्या विकासावर काम करतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून भारताला बाजूला केले आहे. तेलाच्या साठवण क्षमतेबाबत अमेरिकेने पाकिस्तानशी करार केलाय. सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांनी ही घोषणा केलीय. एक अमेरिकन कंपनी पाकिस्तानला ही सुविधा देणार आहे.