Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात भाविकांच्या आरोग्याशी खेळ, जोतिबा मंदिरात धक्कादायक घटना उघड

कोल्हापुरात भाविकांच्या आरोग्याशी खेळ, जोतिबा मंदिरात धक्कादायक घटना उघड

अनेक भाविक हे कोल्हापुरात विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन करण्यासाठी येत असतात. कोल्हापुरची अंबाबाई, जोतिबा यांसारखी अनेक देवस्थाने कोल्हापुरात आहेत. मात्र कोल्हापुरात याच भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

‘दख्खनचा राजा’ श्रीक्षेत्र ज्योतिबाच्या दर्शनासाठी लाखो भाविक श्रावण षष्ठी यात्रेला गर्दी करत असतात. त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.यात्रेत विक्रीसाठी आणलेली तब्बल ४०० किलो बनावट बर्फी, पेढा आणि हलवा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. या भेसळयुक्त मिठाईची अंदाजित किंमत एक लाख रुपये आहे.

 

जोतिबा ग्रामपंचायतचे सदस्य सुनील नवाळे आणि अधिकारी विठ्ठल भोगण यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांना यात्रेतील दुकानांमध्ये संशयास्पद मिठाई विकली जात असल्याचा संशय आला.

 

त्यानंतर त्यांनी लगेचच अन्न सुरक्षा अधिकारी विजय पाचूपते यांना याची माहिती दिली. पाचूपते यांनी कोणतीही वेळ न घालवता घटनास्थळी धाव घेतली. यानतंर लगेचच तपासणी सुरू केली. यात त्यांना धक्का बसला.

 

डफळापूर येथील एका व्यापाऱ्याकडून खरेदी केलेला आणि १०० रुपये पावशेर दराने विकला जाणारा हा सर्व माल भेसळयुक्त असल्याचे सिद्ध झाले. हा अर्धा टन बनावट माल जप्त करून पंचनामा करण्यात आला. त्यानंतर त्याला ग्रामपंचायत कार्यालयातून थेट डंपिंग ग्राऊंडवर नेऊन नष्ट करण्यात आले.

 

या घटनेमुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही तातडीने दखल घेतली. त्यांनी प्रशासनाला इतर खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना या पेढे, बर्फी, खवा आणि अन्य मेवा मिठाईचे नमुने तपासणीसाठी तातडीने पाठविण्याच्या सूचना दिल्या.

 

त्यांनी हे पदार्थ तपासणीसाठी कोल्हापुरात पाठविले आहेत. या एका कारवाईमुळे भाविकांची होणारी फसवणूक टळली आहे. तसेच भेसळ करून पैसे कमवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -