Saturday, August 2, 2025
Homeब्रेकिंगदमदार फिचर्ससह लाँच झाला हा धमाकेदार लॅपटॉप, जाणून घ्या किंमत

दमदार फिचर्ससह लाँच झाला हा धमाकेदार लॅपटॉप, जाणून घ्या किंमत

Acer ने भारतात आपला नवीन लॅपटॉप एसर नायट्रो लाईट 16 भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. या गेमिंग लॅपटॉपमध्ये उत्कृष्ट ग्राफिक्ससाठी इंटेल कोर आय7 प्रोसेसर आणि Nvidia GeForce RTX 4050 जीपीयू सारखे धमाकेदार फीचर्स आहेत. या लॅपटॉपमध्ये दोन इन-बिल्ट स्टीरिओ स्पीकर्स आणि 165 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 16 इंचाचा आयपीएस एलसीडी स्क्रीन आहे. चला तर मग आजच्या या लेखात आपण या लॅपटॉपमध्ये कोणते पॉवरफुल फीचर्स आहेत. तसेच या गेमिंग लॅपटॉपची किंमत किती आहे ते जाणून घेऊयात.

 

Acer Nitro Lite 16 चे फिचर्स

या लॅपटॉपमध्ये 165 Hz रिफ्रेश रेटसह 16 -इंचाचा WUXGA IPS LCD स्क्रीन आहे. या लॅपटॉपमध्ये 16 GB पर्यंत RAM आणि 512 GB SSD स्टोरेजसह i5 आणि i7 असे दोन प्रोसेसर पर्याय आहेत. या लॅपटॉपमध्ये दोन स्टीरिओ स्पीकर्स आणि एक फुल एचडी कॅमेरा आहे, ज्यामध्ये प्रायव्हसी शटर देखील आहे.

 

कनेक्टिव्हिटीसाठी हा लॅपटॉप वाय-फाय 6 आणि ब्लूटूथ व्हर्जन 5.1 कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. याशिवाय USB 3.2 जनरेशन पोर्ट, थंडरबोल्ट 4 पोर्ट, USB 3.2 पोर्ट, HDMI 2.1पोर्ट, इथरनेट पोर्ट आणि कॉम्बो ऑडिओ जॅक देखील समाविष्ट आहेत. बॅकलिट कीबोर्डसह येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये कोपायलटसाठी वेगळे बटण आहे. जेणेकरून तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या एआय फीचर्सचा वापर करू शकाल. या लॅपटॉपला 53Wh बॅटरी देण्यात आली आहे आणि हा लॅपटॉप 100W चार्जिंग सपोर्टसह येतो.

 

Acer Nitro Lite 16 ची भारतातील किंमत

या लॅपटॉपच्या बेस मॉडेलची किंमत 79,990 रुपये आहे, या किमतीत तुम्हाला इंटेल कोर आय5 13420H प्रोसेसरसह 16 जीबी रॅम मिळेल.

 

इंटेल कोर आय7 13620H प्रोसेसर असलेल्या या लॅपटॉपचा व्हेरिएंट 89,999 रुपयांना खरेदी करता येईल.

 

हा लॅपटॉप तुम्हाला एसर रिटेल स्टोअर्स, अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सिंगल पर्ल व्हाइट कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या लॅपटॉपसोबत बँक ऑफर्ससह अनेक उत्तम ऑफर्स देखील सूचीबद्ध आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -