Saturday, August 2, 2025
Homeब्रेकिंगअंत्यसंस्कार झाले, रक्षाविसर्जनही झाले आणि तीच महिला हप्ता भरायला आली,गावच चक्रावून गेले...

अंत्यसंस्कार झाले, रक्षाविसर्जनही झाले आणि तीच महिला हप्ता भरायला आली,गावच चक्रावून गेले !

गावात साश्रूनयनांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले जात होते. तिच्या पतीची अवस्था बिकट झाली होती. जड पावलाने तो लाडक्या पत्नीवरील अंत्यसंस्काराचे प्रक्रीया पार पाडत होता. सर्वत्र तिच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु होता आणि जिच्यावर अंत्यसंस्कार सुरु होते तिच आली चालत हे पाहून गावातले लोक प्रचंड घाबरले.नंतर जर ही जीवंत आहे मग अंत्यसंस्कार कोणावर सुरु होते या विचाराने तर सर्वांनाच चिंतेत टाकले…

 

कोल्हापूरातील जयशिंगपुरात एका महिलेची चिता रचली जाऊन तिच्यावर दु:खी अंतकरणाने अंत्यसंस्कार सुरु होते. आणि ही महिलाच स्वत: चालत आल्याने खळबळ उडाली आहे. जिच्यावर अंत्यसंस्कार सुरु तीच चालत आल्याने हा काय प्रकार आहे. या प्रकाराने तिच्या नवऱ्यासह संपूर्ण कुटुंबाला तर धक्का बसलाच शिवाय गावाची झोप उडाली. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसही चक्रावले. घडल्या प्रकाराची चर्चा सुरु असताना ज्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती कोण? याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

 

बेपत्ता महिलेचा मृतदेह समजूत कुटुंबीयांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पण, घडले मात्र विपरीतच. ज्या महिलेचा मृतदेह समजून अंत्यसंस्कार केले तीच महिला साक्षात गावात हजर झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसही चक्रावले, घडल्या प्रकाराची चर्चा सुरु असताना ज्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती कोण, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

 

मृतदेह सापडला आणि…

जयशिंगपूर शहरातून 37 वर्षीय गृहीणी बेपत्ता झाली होती. तिच्या पतीने जयसिंगपूर पोलिसांत पत्नी बेपत्ता होण्याची फिर्याद दिली. तब्बल 10 दिवसांनी मिरज तालुक्यातील निलजी बामणी इथल्या नदीपात्रात एका महिलेचा काहीसा सडलेला मृतदेह पोलिसांना सापडला. खातरजमा करण्यासाठी बेपत्ता महिलेच्या पतीला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. मृतदेहाच्या अंगावरील खुणा आणि साडीपाहून मृतदेह आपल्या पत्नीचा असल्याचे सांगून प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह ताब्यात देण्यात आला.

 

मंगळवारी रात्री उदगावच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत पै-पाहुण्यांच्या उपस्थितीत या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी सकाळी रक्षाविसर्जनही पार पडले दरम्यान,पै-पाहुणे, मित्रमंडळी सांत्वनासाठी घरी गर्दी करू लागते. कुटुंब दुःखात बुडालेले असताना अचानकपणे बेपत्ता महिला बचत गटातील कर्जाचा हप्ता भरण्यासाठी हजर झाली..आणि गावच चक्रावून गेले. आपण समजून दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती मिळताच संबंधित महिला पुन्हा गायब झाली. त्यामुळे अंत्यसंस्कार झालेली महिला कोण? असा सवाल निर्माण झाला आहे.

 

घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी खातरजमा करून महिलेची शोधमोहीम सुरु केली. काही दिवस बंद असणारा तिचा मोबाईलही सुरू झाला. पोलिसांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधून ती हयात असल्याची खात्री केली.नंतर मनधरणी करून तिला पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले.

 

गालावरील तिळाने घोळ केला

मृतदेह सापडलेल्या महिलेच्या गालावर असणारा तीळ आपल्या पत्नीच्याही गालावर होता.यावरून तो मृतदेह पत्नीचा असल्याचे पतीने सांगितले. केवळ गालावरील तिळामुळे दुसऱ्याच महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबीयांवर आल्याने या विषयाची चर्चा सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -