बिहारमधील आरा सदर रुग्णालयात मोठा गोंधळ उडाला, जेव्हा एका महिला होमगार्ड आपल्या मुलाच्या पार्थिवाजवळ रडत-रडत जीवदान देण्याचा प्रयत्न केला. ती थरथरत वारंवार मुलाला सीपीआर देत होती, तोंडाला तोंड लावत होती, पण मुलगा आता या जगात नाही हे सत्य तिला मान्यच होत नव्हते.
तिच्या आक्रोशाने रुग्णालयातील वातावरण हळहळून गेले.
आरा येथील या १५ वर्षीय मुलाचे नाव मोहित राज असून तो नवादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडना रोड परिसरातील रहिवासी संतोष कुमार यांचा मुलगा होता. शाळेतून आल्यावर मोहित आपल्या खोलीत गेला होता. कुटुंबीयांनी खोलीचे दार उघडले तेव्हा त्यांनी पाहिले की त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तात्काळ त्याला आरा सदर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून तो मृत असल्याचे घोषित केले. मोहितची आई होमगार्ड कॉन्स्टेबल असून सध्या ती जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहे. त्या वेळी ती ड्युटीवर असल्याने घडलेल्या प्रकाराची तिला कल्पना नव्हती. रुग्णालयात पोहोचताच तिने देवाकडे प्रार्थना केली आणि आपल्या मुलाला श्वास देण्यासाठी सतत सीपीआर करण्याचा प्रयत्न केला. Bihar News तरीदेखील मोहितला वाचवता आले नाही. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आरा सदर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंब शोकाकुल झाले असून घरात आक्रोशाचे वातावरण आहे.