इचलकरंजी शहरातील मुख्य बाजारपेठेत दोन गटात हाणामारी झाली. शहरातील व्यंकटराव हायस्कूल जवळच्या रोडवर असणार्या राज्य ज्यूस सेंटर परिसरात गाळ्याच्या मालकीवरून दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला.
हा वाद इतका चिघळला की, तो थेट हाणामारीत बदलला. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हाणामारी झाल्यानंतर काही महिला वाद थांबवताना दिसून आल्या.भर रस्त्यात हाणामारी सुरु झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.