ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 04 August 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष राशी (Aries Daily Horoscope)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा त्रासदायक असेल. नोकरीमुळे तुम्ही काळजीत असाल. तुम्हाला दुसरी नोकरीची ऑफर येऊ शकते, पण सध्याची नोकरी सोडू नका. पैसे वाचवण्यावर भर द्या. बचतीच्या योजनांमध्ये गुंतवणूक कराल. तुम्ही नवीन घर किंवा दुकान खरेदी करू शकता. तुमच्या शेजारच्या लोकांशी चांगले संबंध ठेवा. जर कोणाला पैसे दिले असतील, तर ते तुम्हाला परत मिळू शकतात.
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)
वृषभ राशीच्या व्यक्तींचे आज मन थोडे अस्वस्थ असेल. कारण तुमच्या डोक्यात अनेक गोष्टी सुरू असतील. तुम्ही एखादी गोष्ट गुप्त ठेवली असेल, तर ती कुटुंबासमोर उघड होऊ शकते. तुमच्या घरात नवीन पाहुणा येऊ शकतो. प्रवासाला जाताना तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. तुमची कामे उद्यावर ढकलू नका. दुसऱ्याच्या बोलण्यामुळे तुमचे काम बिघडू शकते. राजकारणात तुम्हाला एका मोठ्या नेत्याला भेटण्याची संधी मिळेल.
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)
मिथुन राशीच्या व्यक्तींनो आज तुमच्या खर्चाकडे लक्ष द्यावे लागेल. तज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू नका. मुलांच्या वागणुकीमुळे तुम्हाला काळजी वाटेल. तुमच्या व्यवसायातील भागीदार तुम्हाला धोका देऊ शकतो. एखाद्या कायदेशीर प्रकरणात तुम्हाला अनुभवी व्यक्तीची मदत घ्यावी लागेल. तुमच्या वडिलांचे बोलणे तुम्हाला वाईट वाटू शकते, पण ते तुमच्यासाठी फायद्याचे असेल.
कर्क राशी (Cancer Daily Horoscope)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. तुम्ही नवीन घर घेऊ शकता, ज्यामुळे घरात आनंद राहील. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध चांगले होतील, पण तुमच्या बॉसला तुमचे बोलणे आवडणार नाही, म्हणून महत्त्वाची माहिती कोणासोबत शेअर करू नका. घर आणि बाहेरच्या कामांमध्ये समतोल ठेवा. नाहीतर घरातील लोक नाराज होऊ शकतात. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.
सिंह राशी (Leo Daily Horoscope)
सिंह राशीच्या व्यक्तींंना आज कामातील चुका सुधारून व्यवसायात वाढ करायची संधी मिळेल. दूरच्या नातेवाईकांकडून तुम्हाला काही वाईट बातमी मिळू शकते, पण कुटुंबातील एखाद्याच्या लग्नातील अडचणी दूर होतील. तुमच्या जुन्या चुकांमधून शिका. जर तुम्ही कर्ज घेतले असेल, तर ते फेडण्याचा प्रयत्न कराल. तुमच्याकडे पैसे वाढल्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल.
कन्या राशी (Virgo Daily Horoscope)
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस प्रगतीसाठी उत्तम असेल. तुमची काम करण्याची क्षमता चांगली राहील. जर तुम्हाला कोणताही जुना आजार असेल, तर त्यात आराम मिळेल. तुम्हाला मनासारखे काम मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल, जिथे तुमची नवीन लोकांशी ओळख होईल. ही ओळख तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल.
तुळ राशी (Libra Daily Horoscope)
तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अडचणींनी भरलेला असेल. कामांमध्ये तुम्हाला तणाव जाणवेल. कारण व्यवसायात फायदा न झाल्यामुळे तुम्ही निराश व्हाल. तुम्ही कोणत्याही योजनेत पैसे गुंतवले, तर ते बुडू शकतात. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या, नाहीतर नंतर पश्चात्ताप होईल. गाडी अचानक खराब झाल्यामुळे तुमचा खर्च वाढू शकतो. तुमच्या भावंडांसोबत तुमचे संबंध सुधारतील.
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज तुम्ही सकारात्मक विचार ठेवा. कारण तुमच्या चांगल्या विचारांमुळे तुम्ही तुमच्या शत्रूंवर मात करू शकता. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही लोकांचे भले कराल, पण लोक त्याला तुमचा स्वार्थ मानू शकतात. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांपासून दूर जाऊ नका. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला दुसरी चांगली संधी मिळू शकते.
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)
धनू राशींच्या व्यक्तींना आज पैशांच्या व्यवहारात घाई करु नये. व्यवसायात विचारपूर्वकच पैसे गुंतवा, कारण कोणताही धोका घेणे हानिकारक ठरू शकते. तुम्ही तुमच्या घराची दुरुस्ती किंवा रंगकाम करण्याचा विचार कराल. जर कोणतीही कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देत असेल, तर ती दूर होईल. तुमच्या सहकाऱ्याशी बोलताना काळजी घ्या. प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल.
मकर राशी (Capricorn Daily Horoscope)
मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूप धावपळीचा असेल. प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल. तुमच्या जुन्या चुकांमधून शिका. खूप दिवसांनी जुन्या मित्राला भेटून तुम्हाला आनंद होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासातील तणावातून आराम मिळेल, पण सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांनी मेहनत सुरू ठेवावी. तुम्ही तुमच्या आईशी मनातील गोष्टींबद्दल बोलू शकता.
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. जर तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन करून काम केले, तर ते चांगले राहील. तुम्हाला एकामागून एक आनंदाच्या बातम्या मिळतील आणि नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमचे बॉस तुमच्या कामावर खूप खुश असतील. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एखादी सरप्राईज पार्टी ठेवू शकता, पण वाहन चालवताना काळजी घ्या.
मीन राशी (Pisces Daily Horoscope)
मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस काही अडचणी घेऊन येईल, कारण तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात. एखादे काम बिघडू शकते. नोकरीत तुम्हाला काही नवीन विरोधक मिळू शकतात. जर तुमच्या मुलांना अभ्यासात काही समस्या येत असतील, तर तुम्हाला त्यांच्या शिक्षकांशी बोलणे आवश्यक आहे. कोणत्याही नवीन कामात विचारपूर्वकच हात घाला. तुमच्या वडिलांचा जुना आजार पुन्हा सुरू होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल.