राज्य परिवहन विभागाने हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी (HSRP) दिलेली मुदत 15 ऑगस्टला संपत आहे. जर दिलेल्या मुदतीत नवी नबंर प्लेट लावली नाही तर त्या वाहनांवर कारवाई (Action)केली जाणार आहे. राज्य परिवहन विभागाने हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी दिलेली मुदत संपण्यासाठी आता फक्त 10 दिवस शिल्लक राहिले आहेत. 15 ऑगस्टला मुदत संपत असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
तसंच नियमाचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई (Action)केली जाणार असून, दंड ठोठावला जाणार आहे. हा दंड 1000 ते 10 हजारांपर्यंत असेल. याआधी मार्च 2025, एप्रिल 2025 आणि जून 2025 अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. याआधी अनेक त्रुटींमुळे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी मुदत वाढवून देण्यात आली होती. ऑनलआइन बुकिंमगमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी, बेकायदेशीर बुकिंग, गर्दी, मर्यादित प्लेट्स अशा अनेक कारणांमुळे मुदत वाढवण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 2.1 कोटी वाहनं असून, आतापर्यंत फक्त 23 लाख वाहनांनाच नव्या नंबर प्लेट्स लावण्यात आल्या आहेत.1 एप्रिल 2019 पूर्वी रजिस्ट्रेशन झालेल्या सर्व वाहनांना HSRP बसवणं बंधनकारक आहे. यामध्ये दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, व्यावसायिक, खासगी सर्व वाहनांचा समावेश आहे. 2019 नंतरच्या वाहनांना आधीच या प्लेट्स लावण्यात आल्या असल्याने त्यांना याची गरज नाही.
HSRP साठी नोंदणी कशी करायची?
www.transport.maharashtra.gov.in किंवा www.bookmyhsrp.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करा,तुमच्या वाहनाच्या रजिस्ट्रेशननुसार, योग्य RTO कोड निवडा, वाहनाची माहिती भरा ज्यामध्ये नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाका,जवळच्या फिटमेंट सेंटरवर तारीख आणि वेळ निवडा
तुम्हाला जी तारीख दिली जाईल त्या तारखेला फिटमेंट सेंटवर आपलं वाहन घेऊन जा, वाहनाप्रमाणे तुमच्याकडून फी आकारली जाईल.
जी वाहनं HSRP लावणार नाहीत त्यांच्यावर 15 ऑगस्टनंतर कारवाई केली जाणार. मोटर वाहन कायद्यातील कलम 177 अंतर्गत त्यांच्यावर 1 हजार ते 10 हजारांपर्यंत दंड आकारला जाईल. दरम्यान ज्यांनी 15 ऑगस्टपूर्वी अपॉईमेंट घेतली आहे त्यांना दंड लागणार नाही. एचएसआरपी नंबर प्लेट्समध्ये विशेष वैशिष्ट्ये असतात, जसे की युनिक सीरियल नंबर, क्रोमियम-आधारित होलोग्राम, आणि टॅम्पर-प्रूफ डिझाइन. यामुळे वाहनांची ओळख निश्चित करणं सोपं होतं आणि बनावट नंबर प्लेट्सचा वापर रोखला जातो.
या प्लेट्समुळे वाहन चोरी, बनावट कागदपत्रांचा वापर, आणि इतर गुन्हेगारी कृत्यांना आळा बसतो. कारण या प्लेट्स सहजपणे कॉपी करता येत नाहीत आणि त्यांच्यावर युनिक कोड असतो जो वाहनाच्या मालकाशी आणि आरटीओ डेटाबेसशी जोडलेला असतो.एचएसआरपी प्लेट्समुळे वाहनांचा डेटा डिजिटल पद्धतीने ट्रॅक करणं शक्य होतं. यामुळे वाहनाची माहिती, मालकाची ओळख, आणि रजिस्ट्रेशन तपशील त्वरित तपासता येतात.
एचएसआरपीमुळे देशभरात वाहन नोंदणी प्रक्रियेत एकसमानता येते. या प्लेट्स सर्व राज्यांमध्ये समान डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह उपलब्ध असतात, ज्यामुळे आंतरराज्यीय वाहन हालचालींवर देखरेख ठेवणं सोपं होतं.एचएसआरपी प्लेट्स अॅल्युमिनियमपासून बनवल्या जातात आणि त्या टॅम्पर-प्रूफ असतात. तसेच, त्यांच्यावर रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह फिल्म आणि ‘IND’ होलोग्राम असतो, ज्यामुळे त्या टिकाऊ आणि सुरक्षित असतात.
युनिक सीरियल नंबर: प्रत्येक प्लेटवर १०-अंकी युनिक नंबर असतो.क्रोमियम होलोग्राम: बनावट प्लेट्स ओळखण्यासाठी भारताचा चक्र लोगो असलेला होलोग्राम.स्नॅप लॉक: प्लेट एकदा लावल्यानंतर ती काढणं कठीण असतं. रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह फिल्म: रात्रीच्या वेळी दृश्यमानता वाढवते. ‘IND’ चिन्ह: आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख दर्शवते.