उत्तराकाशीतील धारली गावात ढगफुटीने एकच विध्वंस झाला. येथील व्हिडिओ अंगावर काटे आणणारे आहे. आता प्रशासनाने हरिद्वारामध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. उत्तराखंडसह गंगा खोऱ्यात मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह वेगवान आहे. प्रशासनाने महापूराचा धोका ओळखून नदी किनारी जाण्यास मज्जाव केला आहे. या पट्यात मदत आणि बचाव पथके तयार ठेवण्यत आली आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथक, आयएआरएस प्रणाली, मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि प्रशासनातील इतर अधिकारी घटनेवर लक्ष ठेऊन आहेत. या 7 राज्यांना हवामान खात्याने हाय अलर्ट जाहीर केला आहे. या भागातील नद्यांना महापूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात धार्मिक यात्रेसाठी अथवा पर्यटनासाठी जात असाल तर सतर्क राहा.
या राज्यांना पुराचा धोका
आसाम, बिहार, उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यासह देशातील काही राज्यात महापूराचा धोका असल्याचे केंद्रीय जल आयोगाने स्पष्ट केले आहे. पाणी पातळी वाढून नद्या धोक्याची पातळी ओलंडण्याची शक्यता आहे. याविषयीचा अलर्ट आयोगाने आज सकाळी दिला आहे. गंगा नदीसह तिच्या साहय्यक नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे.
यामध्ये आसाममधील धलेश्वरी नदी, कटखल नदी, बुरिदेहिंग नदी आताच धोक्याच्या पातळीवर वाहत असल्याचे म्हटले आहे. तर बिहार राज्यातील गंगा नदी ठिकठिकाणी धोक्याच्या पातळीवर आली आहे. यामध्ये बक्स, दानापूर, दीघाघाट, गांधीघाट, हथिदह, भोजपूर, भागलपूर, खगडिया याठिकाणी गंगा धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. याशिवाय बाया, बुढी गंडक, कोसी, बागमती, पुनपुन आणि धरधा या गंगेच्या सहाय्यक नद्यांना पूर आला आहे. उत्तराखंडातील अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांचा जलस्तर वाढला आहे. हरिद्वारमध्ये बाणगंगा तर भागीरथी ही नदी पण धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. झारखंडमध्ये साहेबजंग येथे गंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.
चार जणांचा मृत्यू, 50 हून अधिक बेपत्ता
उत्तरकाशी जिल्ह्यातील थराली गावात मंगळवारी रात्री ढगफुटी झाली. त्यात मोठं नुकसान झाले. काही तासात 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. तीव्र पाऊस पडला तर अशा घटनांना ढगफुटी म्हटले जाते. त्यामुळे खड्डाळ भागात पूर आणि भूस्खलन झाले. या घटनेत 4 जणांचा मृत्यू ओढावला तर 50 हून अधिक जण बेपत्ता झाले. हवामान बदलामुळे मान्सूनचा पॅटर्न बदलला आहे. त्यातच उत्तराखंडात पर्यटनाच्या नावाखाली अनेक ठिकाणी झालेली वृक्षतोड, बांधकामं यामुळे अनेक डोंगराखालील भाग भुसभुशीत झाला आहे. त्यामुळे उत्तराखंडात सातत्याने भूस्सखलन आणि मलबा वाहून येण्याच्या घटना वाढल्या आहेत.