Wednesday, August 6, 2025
Homeमहाराष्ट्रसेन्सेक्स १६६ अंकांनी घसरून बंद, PSU Bank शेअर्स तेजीत

सेन्सेक्स १६६ अंकांनी घसरून बंद, PSU Bank शेअर्स तेजीत

भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि. ६ ऑगस्ट) सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. सेन्सेक्स १६६ अंकांनी घसरून ८०,५४३ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ७५ अंकांच्या घसरणीसह २४,५७४ वर स्थिरावला.PSU बँक वगळता इतर सर्व सेक्टरल निर्देशांक घसरणीसह बंद झाले. आयटी, मीडिया, रियल्टी, फार्मा, एफएमसीजी १ ते २ टक्क्यांनी घसरले. तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात प्रत्येकी १ टक्के घसरण झाली.

 

आरबीआयच्या पतविषयक धोरण समितीने रेपो दर ५.५ टक्के एवढा कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे बाजारात कोणताही उत्साह दिसून आला नाही. त्याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमक्यांमुळे बाजारातील भावना कमकुवत झाल्या आहेत. परिणामी सेन्सेक्स- निफ्टी घसरणीसह बंद झाले.

 

गुंतवणूकदारांचे २.८८ लाख कोटी उडाले

 

आजच्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.८८ लाख कोटींनी कमी होऊन ४४५.०८ लाख कोटी रुपयांवर आले. याआधी ५ ऑगस्ट रोजी बाजार भांडवल ४४७.९६ लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २.८८ लाख कोटी रुपयांची घट झाली.

 

दरम्यान, फार्मा आणि आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक दबाव राहिला. रियल्टी आणि एफएमसीजी शेअर्सवरही दबाव दिसून आला. तर पीएसयू बँक निर्देशांक ०.६ टक्के वाढून बंद झाला. Nifty PSU Bank Index वर युनियन बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. एसबीआय, बँक ऑफ बडोदा हे शेअर्सही तेजीत बंद झाले.

 

Sensex Today | कोणते शेअर्स तेजीत, कोणते घसरले?

 

सेन्सेक्सवर एशियन पेंट्सचा शेअर्स २ टक्के वाढला. भारत इलेक्ट्रॉनिक्स, ट्रेंट, अदानी पोर्ट्स, एसबीआय, एम अँड एम हे शेअर्सही हिरव्या रंगात बंद झाले. तर दुसरीकडे सन फार्माचा शेअर्स २.३ टक्के घसरला. टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, इन्फोसिस, एचसीएल टेक, इटरनल हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -