Thursday, August 7, 2025
Homeब्रेकिंगअकिवाट येथे रस्त्यावर मगर; शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण

अकिवाट येथे रस्त्यावर मगर; शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण

अकिवाट (ता. शिरोळ) येथील राजापूर रस्त्यावरून सोमवारी रात्री मगर पूल पार करत असताना शेतकर्‍यांना दिसली. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. कृष्णा नदीची पातळी घटल्यामुळे मगरींचा नैसर्गिक अधिवास बाधित झाला.

 

परिणामी, नव्या अधिवासाच्या शोधात मगरी मानवी वस्तीकडे वळत आहेत. पुलाखाली दाट गवत व झाडी असल्याने या ठिकाणी मगरी वावरत आहेेत. माजी सरपंच विशाल चौगुले यांनी वन विभागाने घटनास्थळी पथक पाठवावे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी फिरणे टाळावे, असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -