Thursday, August 7, 2025
Homeराजकीय घडामोडीमोठी बातमी! शरद पवारांना आणखी एक धक्का, माजी आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

मोठी बातमी! शरद पवारांना आणखी एक धक्का, माजी आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पक्षांतराचे प्रमाण वाढले आहे. बऱ्याच नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे. अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी उद्या सकाळी 11 वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासह शेकडो कार्यकर्तेही काँग्रेसचा हात हातात घेणार आहेत. त्यामुळे परभणीत शरद पवारांची चिंता वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी उद्या काँग्रेसचा झेंडा हातात घेणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता मुंबईतील टिळक भवन येथील काँग्रेस कार्यालयात हा सोहळा पार पडणार आहे. काँग्रेसचे नेते सिद्धार्थ हत्तीअंबिरे आणि बाबाजानी दुर्राणी यांनी आज प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घेतली भेट. त्यामुळे आता बाबाजानी दुर्राणी हे आपल्या समर्थक व पदाधिकाऱ्यांसह उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे.

 

मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

माजी राज्यमंत्री, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि परभणी जिल्ह्यातील नेते सुरेश वरपूडकर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता बाबाजानी दुर्रानी यांना काँग्रेस मध्ये मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या पदाची माहिती समोर येणार आहे.

 

बाबाजानी दुर्राणी कोण आहेत?

बाबाजानी दुर्राणी 2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर आमदार झाले होते. त्यानंतर 2012 आणि 2018 मध्ये शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं होतं. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी हे अजित पवारांसोबत गेले होते. मात्र काही काळानंतर ते पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाले होते. त्यानंतर आता ते शरद पवारांची साथ सोडत काँग्रेसचा हात हातात घेणार आहेत.

 

धाराशिवमध्येही शरद पवारांना धक्का

शरद पवार यांच्या पक्षाला धाराशिवमध्येही मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे भूम-परांडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे आता धाराशिवनंतर परभणीतही शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -