Thursday, August 7, 2025
Homeतंत्रज्ञानभारतात लाँच झाला Vivo चा आणखी एक स्वस्त फोन, पोको आणि मोटोरोलाच्या...

भारतात लाँच झाला Vivo चा आणखी एक स्वस्त फोन, पोको आणि मोटोरोलाच्या नवीन फोनला देणार टक्कर

विवो कंपनीने भारतीय बाजारात त्यांचा मीड-रेंज नवीन स्मार्टफोन Vivo Y400 5G लाँच केला आहे. गेल्या महिन्यात भारतात Y400 Pro लाँच झाल्यानंतर लवकरच हा नवीन स्मार्टफोन येत आहे. कंपनीचा हा नवीनतम स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 6000 mAh बॅटरी, 90 वॅट वायर्ड चार्ज सपोर्ट, 50 मेगापिक्सेल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारख्या फिचर्ससह लाँच करण्यात आला आहे. चला तर मग आजच्या या लेखात आपण जाणून घेऊयात हा फोन किती किंमतीला खरेदी करता येईल?

Vivo Y400 5G चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: विवोच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस रिझोल्यूशन असलेला एमोलेड डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 1800 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

 

 

चिपसेट: या हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 4th जनरेशन 2 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

 

कॅमेरा सेटअप: मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा सोनी IMX852 प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ कॅमेरा आहे. त्याच वेळी, फोनच्या समोर 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आलेला आहे.

 

बॅटरी क्षमता: फोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

 

Vivo Y400 5G ची भारतातील किंमत

या Vivo स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत,8 GB / 128 GB असलेला व्हेरिएंटची किंमत 21 हजार 999 आहे तर 8 GB / 256 GB व्हेरिएंट असलेल्या फोनची किंमत 23 हजार 999 रूपये इतकी आहे.

 

या फोनच्या सेलबद्दल बोलायचे झाले तर, या फोनची विक्री 7 ऑगस्टपासून कंपनीच्या साइट, Amazon आणि Flipkart तसेच ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर सुरू होईल.

 

जर तुम्ही हा फोन खरेदी करताना SBI, IDFC, Yes Bank, Federal Bank कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक मिळेल. याशिवाय कंपनी जिरो डाउन पेमेंटसह 10 महिन्यांची EMI सुविधा देत आहे.

 

Vivo Y400 5G हा स्मार्टफोन या फोनला देणार टक्कर

स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, 20 ते 25 हजार रुपयांच्या किमतीच्या रेंजमध्ये हा फोन MOTOROLA Edge 60 Fusion 5G, Nothing Phone 3a, POCO X7 Pro 5G आणि REDMI Note-14 Pro 5G सारख्या स्मार्टफोन्सना कडक टक्कर देणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -