Friday, August 8, 2025
Homeब्रेकिंगलाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! १५४० महिलांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर, तुमचंही नाव...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! १५४० महिलांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर, तुमचंही नाव आहे का?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला ३ सिलिंडर मोफत मिळतातयवतमाळमधील १५४० महिलांना मिळणार मोफत सिलिंडर

लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी आहे.

 

आता लाडक्या बहि‍णींना मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना वर्षभरात तीन सिलिंडर मोफत मिळणार आहेत. आता त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल १५४० लाडक्या बहि‍णींना मोफत सिलिंडर मिळणार आहेत.

 

महिलांना मिळणार मोफत सिलिंडर (These Women Get Free Cylinder)

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत असताना आता त्यात नव्याने भर पडणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार पाचशे चाळीस लाडक्या बहिणींना तीन मोफत सिलिंडर दिले जाणार आहेत.वर्षभरात हे तीन सिलेंडर राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहेत.

 

अन्नपूर्णा योजनेतून हा लाभ लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या आणि महिलांच्या नावे सिलिंडर कनेक्शन असणाऱ्या गृहिणीसाठी राज्य शासनाने अन्नपूर्णा योजनेतून मोफत सिलिंडर मोहीम सुरू केली आहे.

 

अन्नपूर्णा योजना नक्की आहे तरी काय? (What is Mukhyamantri Annapurna Yojana)

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अन्नपूर्णा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना मोफत सिलिंडर दिले जातात. वर्षभरात ३ सिलिंडर देण्याचे आश्वासन सरकारने केले आहेत. आता त्यातील एक सिलिंडर महिलांना लवकरच मिळणार आहे.

 

पात्रता काय? (Mukhyamantri Annapurna Yojana Eligibility)

 

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांचे उत्पन्न २.५ लाख रुपये असावे.

 

महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.

 

२१ ते ६५ वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

महिलांचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आहे?

 

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत महिलांना वर्षाला ३ सिलिंडर मोफत मिळतात.

 

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत सिलिंडर मिळणार का?

 

हो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत सिलिंडर मिळणार आहेत.

 

लाडकी बहीण योजनेत किती पैसे मिळतात?

 

लाडकी पबहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात.

 

लाडकी बहीण योजना कोणी सुरु केली?

 

लाडकी बहीण योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाली होती.

 

महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री कोण आहेत?

 

महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -