भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाने तुमच्यासाठी एक उत्तम प्लॅन आणला आहे जो रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडेही नाहीये. तर या प्लॅनची किंमत 365 रुपये असून तुम्हाला या प्लॅनमध्ये ‘अनलिमिटेड’ डेटा देखील मिळत आहे. ३६५ रुपयांमध्ये अमर्यादित डेटा कसा उपलब्ध आहे हे पाहून आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण 365 रुपयांच्या प्लॅनचे फायदे जाणून घेणार आहोत.
व्होडाफोन आयडियाचा 365 रूपयांचा प्लॅन तपशील
अमर्यादित 4G डेटासह डेटा अनलिमिटेड म्हटले जात असले तरी या रिचार्ज प्लॅनमध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या प्लॅनमध्ये देखील एक मर्यादा आहे. व्होडाफोन आयडियाचा 365 रुपयांचा प्लॅन अमर्यादित 4G डेटासह येतो. व्होडाफोन आयडियाचा या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ घेता येणार आहे, त्यातच या प्लॅनमध्ये अमर्यादित डेटाची मर्यादा 300GB देण्यात आलेली आहे.
व्होडाफोन आयडियाचा 365 प्लॅनची वैधता
365 रुपयांच्या प्लॅनसह व्होडाफोन आयडिया प्रीपेड वापरकर्त्यांना कंपनीकडून 28 दिवसांची वैधता मिळेल. हा एक नॉन-स्टॉप हिरो कॅटेगरीचा प्लॅन आहे. वापरकर्ते आता बहुतेक सर्कलमध्ये या प्लॅनचा लाभ घेऊ शकतात. Vi चा 365 रुपयांचा प्लॅन वापरकर्त्यांना आकर्षित करू शकतो आणि हा प्लॅन कंपनीचा ARPU (प्रति वापरकर्ता सरासरी महसूल) वाढविण्यास मदत करू शकतो.
एअरटेलचा 379 प्लॅन
एअरटेलकडे 365 रुपयांचा प्लॅन नाही पण त्यांचा 379 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी हाय स्पीड डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस मिळतात. 1 महिन्याच्या वैधतेसह तुम्हाला स्पॅम अलर्ट, हेलोट्यून आणि पर्प्लेक्सिटी प्रो एआयचा अॅक्सेस मिळतो.
जिओचा 349 प्लॅन
रिलायन्स जिओचा 349 रुपयांचा प्लॅन ३६५ रुपयांचा नसला तरी, तो अमर्यादित डेटा देत नाही पण तो दररोज 2 जीबी दराने एकूण 56 जीबी डेटा देतो. डेटा व्यतिरिक्त, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात. या प्लॅनमध्ये जिओ हॉटस्टारचा फायदा आणि 90 दिवसांसाठी 50 जीबी क्लाउड स्टोरेज मोफत मिळते.