Saturday, August 9, 2025
Homeब्रेकिंगभारतासाठी धावून आला हा देश, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीचे ठिकाण आणि तारीख...

भारतासाठी धावून आला हा देश, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीचे ठिकाण आणि तारीख ठरली

अमेरिकेकडून भारतावर मोठा कर लादण्यात आलाय. टॅरिफमध्ये वाढ झाल्याने भारत चिंतेत आहे. याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. मात्र, भारत अमेरिकेसमोर अजून झुकला नसल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी काल एका प्रश्नाला उत्तर देताना भारतासोबतच्या व्यापार संबंध तोपर्यंत पुढे जाणार नाहीत, जोपर्यंत हा विषय निकाली लागणार नाही, असे म्हटले होते. भारत रशियाकडून कच्चे तेल विकत घेत असल्याची पोटदुखी डोनाल्ड ट्रम्पला आहे.

 

डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत होणार भेट

डोनाल्ड ट्रम्पने जाहीरपणे बोलून दाखवले की, भारताकडून आम्ही वस्तू खरेदी करतो पण भारत आमच्याकडून नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाच्या विरोधात भारताच्या बाजूने काही देशही उभे असल्याचे बघायला मिळतंय. आता त्यामध्येच मोठा घडामोडींना वेग आल्याचे बघायला मिळतंय. यादरम्यानच अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे ष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट होणार आहे

 

ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष

 

हेच नाही तर अमेरिकेने ज्याप्रकारे भारतावर कर लादला आहे, त्यानंतर पुतिन भारतात येणार असल्याचेही सांगितले जातंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी घोषणा केली की, ते 15 ऑगस्ट रोजी अलास्का येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतील. या भेटीबद्दलची पोस्ट त्यांनी थेट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या भेटीकडे आता संपूर्ण जगाच्या नजरा लागल्याचे बघायला मिळतंय.

 

भेटीमध्ये विविध विषयांवर होणार चर्चा

 

युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध मागील काही दिवसांपासून सुरू आहे, ते बंद करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबवण्याचे प्रयत्न अमेरिकेकडून केली जात आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांच्याकडून युक्रेनला पाठिंबा देखील दिला जातोय. भारताच्या प्रत्येक मदतीला कायमच रशिया धावून आलाय. आता यावेळी रशियाकडून भारताला कशाप्रकारे मदत होते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या भेटीमध्ये भारतावर लावण्यात आलेल्या कराबद्दल देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -