इंडियन ऑईल कॉर्पोरेशन दक्षिण विभागात 475 अपरेंटिस पदांसाठी भरती जाहीर (Public)झाली असून, पात्र उमेदवारांकडून 8 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2025 दरम्यान ऑनलाइन अर्ज मागवले जात आहेत.इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड ने दक्षिण विभागामार्फत 2025 साठी 475 अपरेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती ‘अपरेंटिसेस अॅक्ट, 1961’ अंतर्गत असून यात ट्रेड, टेक्निशियन आणि ग्रॅज्युएट अपरेंटिस यांचा समावेश आहे.
संबंधित पदे तामिळनाडू, पुडुचेरी, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत(Public). अर्ज करण्याची प्रक्रिया 8 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार असून 5 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. निवड प्रक्रियेत उमेदवारांची शैक्षणिक पात्रतेच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी होईल.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व दिव्यांग उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र, अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही भरती पूर्णपणे मोफत असून, हे अनेकांसाठी आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरू शकते.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IOCL च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.iocl.com) जाऊन ‘Careers’ विभागातील ‘Apprenticeships’ या टॅबमध्ये प्रवेश करावा. त्यानंतर अधिकृत जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज भरावा आणि आवश्यक कागदपत्रांची स्कॅन प्रती अपलोड करावी. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट किंवा PDF फाईल जतन करावी. या संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल व ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
सिंबायोसिस SCDL च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिल्लीमध्ये करिअर अॅक्सिलरेशन मास्टरक्लास! विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधीही भरती एक वर्ष कालावधीसाठी असून, निवड झालेल्या उमेदवारांना IOCL सारख्या नामांकित सरकारी संस्थेत प्रशिक्षणाचा सुवर्णअवसर मिळेल. यामुळे तरुणांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव घेता येईल व भविष्यातील नोकरीसाठी अधिक चांगल्या संधी निर्माण होतील. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी ही संधी हातची जाऊ न देता लवकरात लवकर अर्ज करावा.