शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी तसे पाहिले तर अनेक फंड आणि शेअर आहेत. परंतू त्यातील काही असे आहेत जे गुंतवणूकदारांचा मोठा लाभ करतात. असाच सर्वात मोठी प्रायव्हेट बँक HDFC देखील फंड आहे. ज्यात गुंतवणूक करणाऱ्यांना लागलीच चांगला रिटर्न मिळाला आहे.जर या फंडाच्या सुरुवातीलाच यात 5 हजार रुपये मासिक SIP केली होती, आजच्या तारखेला फंड सुमारे 10 कोटी रुपये झाला असता. हेच नाही यात एक रकमी गुंतवणूकीवर या फंडाने कमालीचा रिटर्न दिला आहे.
कोणता फंड आहे ?
आम्ही एचडीएफसी बँकेच्या ज्या फंडाबाबत बोलत आहोत. त्याचे नाव HDFC ELSS टॅक्स सेव्हर फंड असे आहे. या फंडला साल 1996 आजपासून 29 वर्षांपूर्वी लाँच केले होते. तेव्हापासून हा फंड लागोपाठ गुंतवणूकदारांची पहिली पसंती बनला आहे. या फंडाच्या लाँचवेळी ज्यांनी 5 हजार रुपयांची एसआयपी केली त्यांची एकूण गुंतवणूक 29 वर्षांत 9.69 कोटी रुपये झाली आहे. तसेच 1 लाख रुपयांची एक रकमी रकमेवरही फंडाने 3,39,62,573 रुपयांचा रिटर्न दिलेला आहे.
काय आहे कॅल्क्युलेशन
29 वर्षांपूर्वी HDFC ELSS टॅक्स सेव्हर फंडात 5,000 रुपयांची मासिक SIP सुरु करणाऱ्यांनी एकूण 17.40 लाख रुपये गुंतवणूक केली. या योजनेने सरासरी 22.09टक्के वार्षिक रिटर्न दिला आहे.ज्यामुळे गुंतवलेली रक्कम वाढून 9.86 कोटी रुपये झाली. एकूण रिटर्न 9.69 कोटी रुपये मिळाला. सोबत या योजनेने लाखो रुपयांची टॅक्स बचत देखील झाली. 29 वर्षांत फंडाने 22.27 टक्क्यांचा शानदार रिटर्न दिलेला आहे.
5 वर्षांत बंपर रिटर्न मिळाला
HDFC ELSS टॅक्स सेव्हर फंडाने गेल्या पाच वर्षांत जबरदस्त रिटर्न दिलेला आहे. रेग्युलर प्लानमध्ये 27.38% आणि डायरेक्ट प्लानमध्ये 28.15%चा रिटर्न मिळाला आहे. या दोन्ही स्कीमच्या गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न मिळाला आहे. जर पाच वर्षांसाठी यात कोणी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर हा फंड आज 3 लाख रुपयांहून जास्त झाला असता. एकूण पाच वर्षांत रेग्युलर आणि डायरेक्ट दोन्ही प्लानच्या फंड्सने कमालीचा फायदा मिळवून दिला आहे.